बेदाणे कोणाला आवडणार नाहीत, असा एकही माणूस सापडणार नाही. बेदाणे द्राक्षापासून तयार करतात. द्राक्षे सुकवली की बेदाणे तयार होतात. बेदाणे तयार करावयाचे असेल तर घरी द्राक्षे विकत घेऊन जमलेली द्राक्षे यांना मणी असे म्हणतात. असे मणी म्हणजे सुटी द्राक्षे घेऊन ती स्टोव्हवर अथवा गॅसवर पाण्यात उकळवतात. थोडे सोडियम हायड्रॉक्साईड एक चमचा घेऊन उकळलेल्या पाण्यात साधारण पाच मिनिटे हलवून ठेवतात. पाणी बाहेर काढल्यावर सर्व मणी बाहेर काढून वाळत ठेवतात. मणी वाळले म्हणजे द्राक्षावर बारीक चिरा दिसू लागतात व द्राक्ष फाटते. अशा रितीने साधारण चार ते सहा दिवस बेदाणे तयार करता येतात. बेदाणे व्यवस्थित रितीने ठेवल्यास ते खराब होत नाहीत. ही झाली घरगुती पद्धत. मोठ्या प्रमाणात बेदाणे तयार करण्यासाठी एक ड्रायर लागतो. त्याचप्रमाणे अॅल्युमिनियममध्ये लहान ट्रे लागतात. ट्रे वाळवून बेदाणे तयार होते. व विकायला तयार असतात. मात्र जून नंतर पावसाळा येतो. त्यामुळे बेदाणेची विक्री थंडावते. साधारणपणे श्रावण भाद्रपद महिना, दिवाळी ते ख्रिसमस यांना भरपूर मागणी असते. हीच पद्धत जर आपण काळी द्राक्षे तयार केल्यास याला काळ्या मनुका असे म्हणतात.
बेदाणे जगामध्ये सर्वत्र आढळतात. अगदी युरोप, न्यूझिलँड, ऑस्ट्रेलिया वगैरे सर्व ठिकाणी मिळतात. बेदाण्यात मात्र साखरेचे प्रमाण खूप असते. जवळजवळ ६० ते ७० टक्के यांत साखर असते. व्हिटॅमिन सी चे प्रमाण फारच कमी असतात. बेदाण्यात साखर असल्यामुळे जर तोंड व्यवस्थित धुतले नाही तर मात्र सूक्ष्म जंतू तयार होतात. म्हणूनच तोंड साफ करणे महत्त्वाचे आहे. बेदाणे कोलेस्ट्रेरॉल अजिबात नसते व ते भरपूर प्रमाणात खाता येते.
एवढी मोठी एनर्जी बेदाणे यामध्ये आहे. १ कपभर बेदाणे खाल्ल्यास त्यामुळे १.२५२ किलो कॅलरीज एवढी मोठी शक्ती मिळते. मात्र बेदाण्यात साखरेचे प्रमाण बरेच कमी असते. कच्चे खाल्ले नाही तर झोपेत साखर तोंडातच राहते म्हणून चूळ भरून घेणे आवश्यक असते.
– मदन देशपांडे
Leave a Reply