नवीन लेखन...

करन्सी काऊंटिंग मशीन

बँकेत नोटा मोजण्यासाठी आता कॉशयरची भूमिका तुलनेने कमी झाली आहे, त्याच्या मदतीला करन्सी काऊंटिंग मशीन आले आहे. या मशिनमध्ये नोटा टाकल्या की, तुम्हाला त्या किती नोटा आहेत हे कळते. अर्थात या नोटा एकाच मूल्याच्या असणे गरजेचे आहे अन्यथा ते किती पैसे आहेत हे सांगणे कठीण होऊन बसेल.

चलनाचे एकूण मूल्य सांगणारे मशिनही आता उपलब्ध आहे. या नोटांचा आकारही त्यांच्या नेहमीच्या स्वरूपात असायला लागतो. काही मशीन तर असेही आहेत की, ज्यात वेगवेगळ्या नोटांची किंमतही सांगितली जाते. व्हेन्डिंग मशिनमध्येही करन्सी काउंटर असतो त्यामुळे ग्राहकाने नेमके किती पैसे जमा केले आहेत हे समजते.

यंत्रात ठेवल्यानंतर आपण हाताने मोजतो त्यापेक्षा अधिक वेगाने या नोटा पटपट उलटत जातात. त्यामुळे प्रकाशाचा एक किरण अडवला जात असतो तो जितक्या वेळा अडतो तितक्या नोटा त्या बंडलात आहेत असे समजले जाते व तो आकडा डिजिटल डिस्प्लेवर प्रदर्शित होत असतो. असली नोटेची एक प्रतिमा या मशिनला दिलेली असते, तिच्याशी या नोटांच्या प्रतिमा ताडून बंडलात किती खोट्या नोटा आहेत हे समजते. नोटा मोजण्याच्या मशिनची निर्मिती अमेरिकेत १९२० मध्ये फेडरल बिल काऊंटर कंपनीने केली.

टेलर मशिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ते तयार केले होते. या तंत्रज्ञानात टोकियो कॅलक्युलेटिंग मशिन वर्कस या शिनागावा येथील कंपनीने मोठे बदल केले. १९८१ मध्ये तर तासाला ७२,००० नोटा मोजणारे आरईआय हाय स्पीड मशीन बाजारात आले. अधिक प्रगत अशा करन्सी काऊंटिंग मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या मदतीने किती नोटा उलटल्या गेल्या यावर लक्ष ठेवले जाते.

मोजलेल्या चलनाची किंमत दाखवणाऱ्या यंत्रात संगणकाच्या मदतीने गणन करून नोटा किती आहेत याबरोबरच त्यांचे एकूण मूल्य सांगणारा आकडा दिला जातो. नोटांप्रमाणेच नाणी वेगळी करण्याचे मशीन असते त्याला कॉईन सॉटिंग मशीन म्हणतात यात व्हायब्रेटिंग प्लॅटफॉर्मवर नाणी ठेवली जातात नंतर ती वेगवेगळ्या आकाराच्या छिद्रात पडतात, नंतर प्रत्येक काण्यात किती नाणी पडली आहेत त्यांची उंची व वजन मोजले जाते, त्यामुळे खोटी नाणी असतील तर ते लक्षात येते.

नाणीही त्यांच्या मूल्याप्रमाणे वेगळी होतात. काही वेळा या नाण्यांचे एकूण मूल्य काढण्यासाठी सॉफ्टवेअर असते. त्याचा उपयोग हा व्हेन्डिंग मशीन व चेंज डिस्पेन्सर (सुटी नाणी देणारे यंत्र) यात केला जातो. करन्सी काऊंटिंग मशिन हे शंभर डॉलरपासून उपलब्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..