नवीन लेखन...

सायकल – तेव्हाची व आत्ताची

१९६०-६५ चा काळ या काळी स्वतःची सायकल असणे म्हणजे आताच्या काळातील मर्सिडीसची एसयूव्ही कारमालकाशीच बरोबरी होण्याचा काळ. आश्या काळी एके दिवशी वडील नवी कोरी सायकल हाताने ढकलत घेऊन घरी आले.ती सायकल पहाताच आईचा पाराच चढला.”

स्वतःला सायकल चालवता येत नाही आसला जाहागीरदारी डोहाळ कसे काय लागले तुम्हाला.इकडं पोरांच्या माझ्या आंगावर निट धडूत नाही त्या कार्ट्याला वह्या नाहीत म्हणून मास्तराने शाळेतुन घरी पाठवलं आणी तुम्हाला ही सायकलची आवदसा आठवली ! आईच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.मी नव्या सायकलची घंट्टी वाजवून पाहीली. सायकलच्या मागच्या चाकाला शिट जवळ डायनामा व पुढे हँडलला लाईट होती.आईला ते कौतुकाने सांगायला गेलो तर पाठीत धपाटा घालून “म्हणाली मुडद्या तु सुध्दा बापासारखाच ” रात्री झोपलो तर स्वप्नात मी सायकल चालवतोय! सकाळी जाग आल्यावर बघतोय तर वडील व सायकल गायब!वडील पहाटेचे ऊठून व कोणी पहाणार नाही असे वस्ती पासून लांब जाऊन सायकल शिकायचा प्रयत्न करत होते. तिन चार दिवसातच वडील सायकल चालवायला शिकले.व रूबाबात वस्तीवरून गावात सायकल वर जाऊ लागले.वस्तीवर नंतर दुसरी सायकल दगडूदादाच्या घरी आली. बैलांच्या बाबतीत वडीलांना चांगले ज्ञान असल्यामुळे बैल खरेदीसाठी वस्तीवरची लोकं त्यांना बैल पंसती साठी सासवड सुपे निरा बारामती यवत आश्या तीस चाळीस कि.मी अंतरावरच्या आठवडे बैल बाजारला घेऊन जात.त्यासाठी वडील सायकलवर जात आसत.

मी सातवीत गेल्यावरच मला सायकल चालवायची परवानगी मिळाली.त्यावेळी वस्तीवर बय्राच सायकली झाल्या.मग काय पोरं,पोरी दिसल्या की एक हात सोडुन तर कधी दोन हात सोडून सायकल चालवून त्यांच्या समोर भाव खात आसे.पण आश्या भाव खाण्यात इतक्या वेळा पडलोय की सायकलचे जेवढे स्पेअर पार्ट आसतील त्या पेक्षा जास्त जखमा सायकलवरून पडून झालेल्या होत्या.घरी आल्यावर तेवढ्यावेळा आईचा मार खाल्लाय.

मला स्वतःची सायकल मिळाली पुण्यात लॉ कॉलेजला प्रवेश घेतल्यावर .बुधवारपेठेत आमचाच गाववाला गुलाब गडदरेच सायकल दुकान होत,त्याच्याकडे ११० रूपयाला सेंकड हँड सायकल वडीलांनी विकत घेऊन दिली.सायकल देताना गडदरे म्हणाला “आता तुझी मॕटनी पिक्चर पहायची चांगली सोय झाली बघ” .तेव्हा पुण्यात डबलशिट सायकलला पोलीस दंड करीत .दंड नाही भरला तर चाकातील हवा सोडून देत.पण या सायकलचा उपयोग कॉलेज स्वारगेटला डबा आणन्यासाठी पिक्चरला जाण्यासाठी चांगलाच होई.

पुण्यात सायकल चोय्रा भरपूर होत.त्या साठी पोलीसांचे “स्वतंत्र सायकल चोरी प्रतिबंधक स्कॉड होते”.सायकल चोरीची तक्रार लगेच पोलीस घेत.आता किती मोठी घरफोडी झाली तरी पोलीस तक्रार घ्यायला टाळा टाळ करतातच.
ह्या सायकलच्या चेनमध्ये आडकून किती तरी पोरांचे पायजमे,पँटा फाटलेल्या वा काळ्या झालेल्या होत्या.सायकलच्या पुढच्या दांडीवर मैत्रीण वा मुलीला बसवून कॉलेजला येणारा मुलगा हा सर्वांच्या दृष्टीनं खरा हिरो असायचा.त्याकाळी पुणे शहर हे सायकलचे व सुंदर पोरींचे शहर म्हणून देशभर प्रसिद्ध होते.

हंम्वर,हार्क्यूलस. हिरो. फिलीप्स कंपणीच्या मडगार्ड,कॕरिआर,लाईट,डायनामा, घंटीने सजलेल्या सायकली रूबाबात पुण्याच्या गल्लीबोळातुन,खेड्यापाड्यातून पोटासाठी पळत होत्या.आत्ता मात्र चारचाकी वहानांच्या गजबजाटातुन ,शिडसिडीत गिअर वाल्या उघड्या चाकाच्या सायकली फुफुस, ह्रदय व मस्सल मजबुत ठेवण्यासाठी कशीबशी वाट काढत केवीलवाणा प्रयत्न करीत धडपडत चाललेल्या दिसतात. जिथे चालणारांना पदपथ मिळत नाही तेथे सायकलला ट्रॕक कोठून मिळणार.तरीही दिनवाण्या झालेल्या सायकलला “सायकल दिनाच्या शुभेच्छा”

बाळासाहेब खोपडे
मोरगांव /पुणे
३ जून २०२४

आम्ही साहित्यिक चे लेखक 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..