दान मागावं मागावं दान भक्तीच मागावं।
दान द्यावं ते द्यावं दान नेत्राचं द्यावं।।
दान मागावं मागावं दान माणुसकीचं मागावं।
दान द्यावं ते द्यावं दान रक्ताचं द्यावं।।
दान मागावं मागावं दान प्रेमाचं मागावं।
दान द्यावं ते द्यावं दान अर्थाचं द्यावं।।
दान मागावं मागावं दान सन्मानाचं मागावं।
दान द्यावं ते द्यावं दान वस्त्राचं द्यावं।।
दान मागावं मागावं दान विवेकाचं मागावं।
दान द्यावं ते द्यावं दान गोमातेचं द्यावं।।
दान घेता घेता एक दिवस देणारे व्हावं।
दान कशाचं मागावं, कशाचं द्यावं हे माणसालाचं
कळावं।।
दान मागावं मागावं दान भक्तीचं मागावं, दान भक्तीचं मागावं।।
Leave a Reply