साहित्य –
एक खवलेला नारळ
दोन पेले पातळ पोहे
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
एक बारीक चिरलेला कांदा
एका लिंबाचा रस
एक चमचा किसलेली कैरी
तीन चमचे साखर
चार हिरव्या मिरच्या
मोहरी
चिमूटभर हळद
हिंग
तेल
चवीपुरतं मीठ
कृती
एक ओला नारळ फोडून त्यातील पाणी बाजूला काढावे. नारळ खवून घ्यावा. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. एका लिंबाचा रस काढावा. हिरव्या मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावे. कैरी किसून घ्यावी.
एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, खवलेला नारळ, साखर, चवीपुरते मीठ,चमचाभर कैरीचा किस, नारळातील पाणी सर्व एकत्र करून सारखे करावे. ५ – १० मिनिटे तसेच झाकून ठेवावे.
छोट्या कढईत डावभर तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि चिमूटभर हळद घालावी. मिरच्यांचे तुकडे घालून गॅस बंद करावा.
या मिश्रणात २ पेले पातळ पोहे घालून कालवावे. नंतर त्यावर तयार केलेली फोडणी घालावी. सर्व एकत्र कालवून अर्धा तास दडपून झाकून ठेवावे.
सर्व्ह करताना डिशमध्ये हे दडपे पोहे घालून वरून थोडी कोथिंबीर घालावी
— निलिमा प्रधान
९८२०३१०८३०
Leave a Reply