![09 L-300](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/04/09-L-300.jpg)
कवी गोविंदाग्रजांनी महाराष्ट्र गीतामध्ये महाराष्ट्राला “दगडांच्या देश” असे म्हटले आहे.
महाराष्ट्र देशीचे हे राकट -कणखर दगड आतून अस्सल हिरे आहेत हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर नाशिक – शिर्डी मार्गावरील सिन्नर MIDC मधील, अशा अत्यंत बहुमोल किंबहुना ज्यांचे मोलच होऊ शकणार नाही अशा दगडांचे अप्रतिम “गारगोटी संग्रहालय ” पाहायला हवे.
पुणे,जळगाव,औरंगाबाद ते थेट मुंबईतील मालाड येथे सापडलेले हे दगड फोडल्यावर आत सापडणारे स्फटिकापासून हिऱ्यांपर्यंत मौल्यवान जडजवाहिर यात पाहायला मिळते.
श्री. कृष्ण चंद्र पांडे या रत्नपारख्याने हे जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारले असून येथे अशा प्रकारच्या दगडांचा जगातील सर्वात मोठा संग्रह आहे. ३५ कोटी वर्षांपूर्वींचा, दागिन्यात वापरायला सुंदर असा निळ्या झुपक्यांचा, काळोखात चमकणारा, भारताच्या नकाशाच्या आकाराचा असे अनेक दगड ( यांना दगड म्हणतांनाही मन कचरते ) येथे आहेत.
पैलू न पाडलेला हिरा,गुजरातमधील डायनासोरचे जीवाश्म ( Fossils), ज्वालामुखीतून उडणारे Volcanic Bombs,कापसासारखे हलके दगड, खाणीत थेट सापडलेला शुद्ध सोन्याचा मोठा तुकडा, चंद्रावरून आणलेला आणि मंगळावरून आणलेला दगड अशा अनेक दुर्मिळ गोष्टी येथे पाहायला मिळतात. गाईड आपल्याला सर्व माहिती देतोच आणि विशेष म्हणजे येथे “फोटोग्राफीस अजिबात मनाई नाही “.
–मकरंद करंदीकर.
Leave a Reply