साहित्य –
दीड वाटी हरभर्याची डाळ
६-७ हिरव्या मिरच्या
चिमुटभर चिरलेली कोथिंबीर
१०-१२ लसूण पाकळ्या
३ चमचे लिंबाचा रस
३ चमचे साखर
चवीपुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद
गव्हाचे पीठ मोहनासाठी
२ डाव तेल
तळणासाठी तेल
कृती –
आदल्या दिवशी रात्री हरभर्याची डाळ भिजत घालावी. दुसर्या दिवशी सकाळी डाळ, हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या एकत्र करून मिक्सरवर वाटाव्या.
वाटलेली डाळ कुकरच्या भांड्यात घेऊन ४-५ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ ताटात गार करत ठेवावी. गार झाल्यावर हाताने मोकळी करून त्यात साखर आणि मीठ घालावे.
कढईत डावभर तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात उरलेला लसूण चिरून घालावा. नंतर डाळ घालून मध्यम गॅसवर परतावे. गॅस बंद करून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारखी करावी.
कणकेत गरम तेलात मोहरी मीठ घालून कणीक घट्ट मळावी. त्याच्या पुर्या लाटाव्या. पुरीच्या मध्यभागी चमचा दीड चमचा डाळीचे सारण घालून त्याला करंजीचा आकार द्यावा.
गरम तेलात करंज्या तळाव्या. दह्याच्या चटणीबरोबर सर्व कराव्या.
सौ. निलिमा प्रधान
Leave a Reply