नवीन लेखन...

दळिता कांडिता

झुंजुमुंजु झालं की घरातील कुणीही एक उठायची. आवरुन झालं की पोत्यावर त्यावर एका कापड अंथरुन त्यावर जातं. मग एका टोपलीत ज्वारी. जात्याच्या वरच्या पाळीवर लाकडी खुंटा ठोकून घट्ट बसवून. जात्याला नमस्कार आणि अडकवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात पहिली माझी माझी ओवी ग…. असे म्हणत अनेक देवांची नावे. माहेर सासरच्या स्वभाव वैशिष्ट्य गाण्यात म्हटली जायची. लहान मूल मांडीवर अर्धवट झोपेत. घरघरघर हे पार्श्वसंगीत. तर इतर जणी सडासारवण. अंघोळीची तयारी साठी चूलीला पेटत घालणे. हंडी भरुन आणणे. नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावात एक चुंबळ घागर हंडा जे असेल ते. लहान मुले साखरझोपेत आणि वृद्ध माणसं जागेवरच बसून नामस्मरण करायचे. रवीराज अजून यायचे असतात म्हणुन त्यांच्या स्वागतासाठी पक्षीगण यांचे सुमधूर स्वागत गीत. दवबिंदूची धडपड. पानांची सळसळ जणू वीणेवर फिरणारी चपलतेने लगबग. अशा वातावरणात ते दळण त्या दिवसापुरते झाले की पीठ भरुन. जातं जागेवर ठेवून ती गृहलक्ष्मी अंघोळ करून चुलीवरच्या गरम गरम भाकरी करायला सज्ज. त्यामुळे सकस पौष्टिक आहार. हे सगळे माझ्या अगोदरच्या फार फार वर्षांपूर्वीची आहे. गिरणी सुरू झाली तसे रोज दळणे बंद झाले. पण माझ्या लहानपणी आणि नंतरच्या काळात भरडा. बेसन. सोजी. मीठ हळद. लाह्या. काही उन्हाळ्यात वाळवणीचे करण्यासाठी जाडसर बाजरी ज्वारी वगैरे दळत असू…..

आता हे सगळे मला का आठवले याचे कारण म्हणजे रविवारी मी एका चॅनेलवर एक कार्यक्रम पाहिला होता. खर तर मी सहसा हे बघत नाही पण काय झालं की मला नाईलाजाने थोडा वेळ बघायला मिळाला. जागेवरून उठता येत नाही म्हणून. चॅनल बदलता येत नाही म्हणून तो होता होममिनीस्टरचा फक्त अकरा लाख रुपयांची पैठणी मिळण्याची स्पर्धा. हा शब्द मला बरोबर वाटत नाही. पण जिंकण्यासाठी स्पर्धा असते. तर काय सांगत होते तर हं तीन समूहातील बायका आळीपाळीने दळत होत्या. डोक्यावर रिकामी घागर घेऊन ठरलेल्या ठिकाणी जात होत्या. मात्र कोण जिंकणार वगैरे मला काही देणे घेणे नाही. मला एवढेच सांगायचे आहे ते म्हणजे जात्यावर दळण कसे करायचे हे जमले नाही ते. पद्धत असते अशी की जाते अनेक प्रकारच्या दगडाचे असतात पण कुरुंदाचे चांगले असे म्हणतात. याला दोन पाळे. जातं एक तात्पुरते तर एक कायमस्वरूपी रोवलेले. दळायला बसताना एकटी किंवा दोघी. उजव्या बाजूला धान्य. व अर्धी मांडी. तर डाव्या बाजूला दुसरा पाय लांब करून बसावे लागते. डाव्या हाताने जातं थोड फिरवून थोडे धान्य घालून सुरू दळण. नंतर उजव्या हाताने सुरू. ही क्रिया दोन वेळा. शेवटी अगदी वेगात फिरवून झाले की जात्याला नमस्कार करुनच पीठ भरायचे असते. पण मीठ लाह्या हे वरुन घालायचे नाही ते अडकून पडते. त्यामुळे त्याची दळण पद्धत वेगळी असते. आता घागर डोक्यावर घेऊन पाणी भरून आणणे सोपे नाही. तोल सांभाळत पाणी न सांडता आणि जपून वापरायला लागते…

यातून आपल्याला काय शिकायचे आहे ते मला जे समजले जाते ते असे. संसारात पण घरच्या कर्त्या माणसाने अगदी घट्टपणा म्हणजेच खबींर मजबूत मनाचा असेल तरच वरच्या पाळी प्रमाणे आपल्या सर्वांच्या सुखासाठी. समाधानासाठी राबणारी मरमर करणारी उसंत न घेता न दमता भिंगरी प्रमाणे फिरणारी तिला साथ दिली तर सर्वांचे कल्याण. आणि नंतर पण निगुतीने पीठ एकत्रित करून भरावे लागते. सर्वांना बांधून ठेवले तरच. वेग. स्पर्धा. गरजेपेक्षा जास्त. योग्य वेळी योग्य निर्णय असे शिकवतात दळण. त्यामुळे कस दळाव हे कळायला हवे.नाही तर काय होईल ते तुम्ही ठरवा पीठा ऐवजी सगळेच अर्धवट. श्रम करताना दमणे आलेच अशा वेळी चिडचिड. त्रागा. दुसर्‍यांना दोषी ठरवणे हे मात्र होऊ नये म्हणून दळिता कांडिता तुज गायीन अनंता यासाठी ओवी.चांगले विचार. अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासाठी..

एकदा का डोक्यावर जबाबदारी घेतली की ती पारपाडताना तोल सांभाळत नुकसान न करता सुखाचा घडा भरावा लागतो. आर्थात हे सगळे एकटीलाच करावे लागते. म्हणून वेग. स्पर्धा. आजुबाजुला न बघता आपल्या मार्गाने सरळ जायचे आहे. आणि तोल सांभाळण्या साठी आरोग्य परिपूर्ण असावे लागते. डोक ठिकाणावर असाव लागत. नाहीतर पाणी नाही. मात्र मेहनत फुकट जाणार. शिवाय पायावर घांगर पडली आणखीन इजा वरुन.. अजूनही खूप काही शिकायला मिळेल यातून. असो. आता कोणाला पैठणी मिळेल हे सांगता येत नाही पण एवढे तरी सांगू शकले. कारण मी हे सगळं जातं आणि घागरी मुळे शिकले आहे म्हणून लेखन प्रपंच.

— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..