ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म ५ डिसेंबर १९२८ रोजी झाला. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचा जन्म मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरवातीचे नृत्य शिक्षण सीताराम प्रसाद यांच्याकडे घेतले.
दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. हे सगळे १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनका जोशी यांनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंती जोशींनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान महत्वाचे होते.
भारतीय नृत्य विदेशात पोहचवण्याचे श्रेय दमयंती जोशी यांना जाते. त्यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. मा.दमयंती जोशी यांचे निधन १९ सप्टेंबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply