नवीन लेखन...

डान्स डायरेक्टर सरोज खान

बॉलीवूड मधील डान्स डायरेक्टरच्या यादीतलं अव्वल नाव म्हणजे सरोज खान. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला. निर्मला किशनचंद साधू सिंग नागपाल हे सरोज खान यांचे खरे नाव. वयाच्या तिसऱ्या वर्षीच ‘नजराना’ या चित्रपटातून त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण झालं होतं. या बालकलाकाराची कारकीर्द पुढे नृत्यक्षेत्रामध्ये बहरली. पुढे हा कलाकार ग्रुप डान्सर बनला. त्यानंतर असिस्टण्ट डान्सर आणि १९७४ ला त्यांनी ‘डान्स मास्टर’ म्हणून पहिल्या सिनेमाला कोरिओग्राफी केली. तो सिनेमा होता, ‘गीता मेरा नाम’. तेव्हापासून ते आज पर्यंत त्यांनी अख्ख्या बॉलिवूडला आपल्या तालावर त्यांनी नाचवलं आहे.

कोरिओग्राफर सरोज खान मास्टरजी म्हणून ओळखल्या जातात. गेल्या ३६ वर्षांपेक्षा जास्त काळ सरोजजी इण्डस्ट्रीमध्ये आहेत. या काळात डान्सच्या फॉर्म्समध्ये, स्टाइलमध्ये खूप परिवर्तन झालं. आजच्या डान्स विषयी त्या एका मुलाखतीत म्हणतात, ‘आजकालच्या डान्समध्ये काय झालाय हे आत्ता मी काय सांगणार.. ते सगळ्यांनाच दिसतंय. अलीकडे सगळे डान्स वेस्टर्न झालेत. त्यातले एक्सप्रेशन्स जाऊन केवळ कसरती आल्या आहेत. आपली संस्कृतीच आपण विसरतोय. मी कधी आयटम नंबर कोरीओग्राफ केले नव्हते का? पण त्यात अश्लीलता कधीच नव्हती.

माधुरीने ‘तेजाब’मध्ये केलेला ‘एक दो तीन’ला तुम्ही आयटम साँग म्हणू शकता. पण तो अश्लील नव्हता. आजही त्या गाण्यावर तुम्ही नाचता. इण्डस्ट्रीमध्ये जो काही बदल झालाय, तो हाच. पण एक नक्की की हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. हिंदी सिनेसृष्टीमध्ये आजवर कित्येक नायिका आल्या. या नायिकांना जिथे कोरिओग्राफीचा स्पर्श झाला तिथे या नायिका बहरल्या. हिंदी इण्डस्ट्रीमधलं सरोज खान हे असं नाव आहे, की ज्यांनी या प्रत्येकीबरोबर काम केलंय. प्रत्येकीच्या नृत्याला बहर आणला. अर्थात या सर्वांमध्ये सरोजजींची लाडकी माधुरी आहे हे आपण जाणतोच. कारण माधुरी समोर असली की, त्यांना हवे ते प्रयोग नृत्यामध्ये करता येतात. त्यांची आवड थोडी बाजूला ठेवली, तरी त्या सर्वच नायिकांना त्या त्या गाण्यानुसार, नायिकेच्या कुवतीनुसार स्टेप्स देतात. जेणेकरून नाचाचा डौल आणि नायिकेची क्षमता कुठेही ढासळणार नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..