दारावरची बेल वाजली
एक मध्यम वयाची स्त्री उभी होती
जास्त सुन्दर नाही परंतु एकदा
मागे वळून बघण्याजोगी.
तुम्हीच सतीश चाफेकर का ?
ते ‘ मी आणि ती ‘ लिहिणारे तुम्हीच ना….
तुमचा पत्ता मिळाला
पण फोन नंबर नाही मिळाला म्ह्णून
डायरेक्ट आले.
या ..आत या…मी म्हणालो.
पाणी दिले …मी म्हणालो..
आपलं नाव….
ती थांबून म्हणाली….मला , ‘ ती ‘ समजा
आता मात्र मी हादरलो.
तुम्ही घाबरू नका…मी आले आहे
पण निश्चित जाईन….काळजी नको.
आता मला खरेच काळजी वाटत होती
हे तिलाही जाणवले….
ती म्हणाली अहो तुम्ही इतके बिन्धास लिहिता..
आणि ..
बाकी तसे नाही…बोला…
तुम्हाला आमची मने कळतात कशी…पहिला प्रश्न..
आमच्या अर्धवट भावनांना तुम्ही जिवंत करता….
कसे शक्य आहे…हे
मी म्हणालो …काही नाही…
परकाया प्रवेश….
मी लिहिताना डबल आयुष्य जगतो…
त्याचे आणि तिचेही …..
तरीपण….कसे कळते…
डोळे उघडे ठेवा….मन मोकळे ठेवा…
ते संस्कृती , संस्कार यांना कोसो दूर ठेवतो त्या
परकाया प्रवेशाच्या वेळी.
खूप बोललो….तिच्याशी ती पण मोकळेपणाने बोलली.
तिच्याशी बोलताना मला एक जाणवले…
हळू हळू ती खूप सुंदर दिसू लागली होती.
खूप वेळ झाला कोणीही घरी नव्हते ,
तिने माझा हात हातात घेतला आणि
आम्ही आणखी जवळ आलो …
चार तास एकत्र होतो फक्त गप्पा मारत ..
फक्त गप्पाच ..समजले
इतक्यात दरवाजाची बेल वाजली.
मी हबकलो …कारण
बेल वाजवण्याची पद्धत माझ्या बायकोची होती.
ती सहज हसून म्हणाली….उघडा दरवाजा.
मी डोळे चोळत, केस सारखे करत , दरवाजा उघडला..
बायको वैतागली होती…इतका उशीर का ?
काही नाही …मी म्हणालो..
तिला म्हणणार होतो , आपल्याकडे कुणीतरी आले आहे…
शब्द ओठावर येतच होते …मागे वळत वळत बोलणार होतोच ..
पण ती मला तेथे दिसलीच नाही…
मी चपापलो…..
काहीतरी वेगळे घडले होते….
ती नाहीशी झाली होती….
म्हणजे ती आलीच नव्हती का ….
मनात विचार केला …
परंतु ..परंतु…
तिने बोलता बोलता मांडीवर घेतलेली उशी मात्र …
दूर ठेवलेली आढळली…ती पाहून
मी चपापलो…
म्हणजे ती आली होती…
मग गेली कुठे…
अंगाला दरदरून घाम फुटला होता…
इतक्यात बायको म्हणालो …
अहो एसी तरी लावून बसा…
किती उकडतंय …..
मी घाम पुसत पुसत ..
त्या लांब बाजूला पडलेल्या
…. उशीकडे बघत होतो.
सतीश चाफेकर
Leave a Reply