
” सध्या प्रत्येक क्षेत्राला व्यापकता आणि संधीची उपलब्धता मिळाल्यामुळे तरुणांचा वेगवेगळ्या तसंच अनोख्या विषयांमध्ये करियर करण्याचा ओढा वाढतोय;आणि असंच एक अनोख क्षेत्र म्हणजे मॉडेलिंग! मुळातच या क्षेत्रात मराठी टक्का तसा नगण्य.तरीसुध्दा काही मुलं-मुली ज्यांना कला क्षेत्राची मनापासून ओढ आहे व या क्षेत्रासाठी आवश्यक असे इत्यंभूत गुण आहेत ते मॉडेलिंगची कास धरून यशस्वी देखील होताना दिसताहेत.मॉडेलिंग विश्वातील असंच एक मराठी नाव, ज्याने महाविद्यालयीन जीवनापासून या क्षेत्रासाठी गोडी दाखवत, ‘फेमिना इंडिया मॅगझीन’ मध्ये झळकण्यापर्यंत स्वत:चं कर्तृ्त्व सिध्द केलं. विविध ‘कमर्शिअल्स’ , ‘ प्रिन्ट शुट्स ‘च्या माध्यमातून व “फॅशन विक्स मध्ये रॅम्प वॉक” करत मॉडेल म्हणून स्वत:ची आगळी-वेगळी ओळख निर्माण करणार्या ‘दर्शन नाईक’ च्या पोर्टफोलिओ विषयी फक्त मराठीसृष्टी.कॉम वर..”
महाविद्यालयात असताना दर्शन ने फॅशन शो पाहिले व या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची आवड त्याला निर्माण झाली.त्यासाठी आवश्यक असणार्या गोष्टींची मेहनत आणि बारकावे समजून घेत या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला; मुळातच उत्तम शरीरयष्ठी, आणि ‘फोटोजेनिक फेस’मुळे मॉडेल म्हणून अनेक कॉण्टेस्ट साठी दर्शनचं सिलेक्शन होत राहिलं; अर्थात सुरुवातीला ‘इंटरकॉलेजिएट कॉम्पीटिशन्स’मध्ये व तिथे शिकतच पुढे नामवंत ब्रॅण्ड्ससाठी रॅम्प वॉक केल्याचं दर्शन सांगतो.

मॉडेलिंग क्षेत्राता करियर घडवण्यासाठी तू कोणती मेहनत घेतलीस? यावर दर्शन उत्तरतो की “रोज नियमित व्यायाम ,आहारात पथ्य, तसंच मॉडेलिंगसाठी आवश्यकतेनुसार अशी शरीरयष्ठी प्राप्त करणं अशा शारिरीक कसरत तर कराव्याच लागतात पण त्याव्यतिरिक्त सुध्दा मॉडेलिंग कॉण्टेस्ट किंवा रॅम्प शो कुठे सुरु आहेत किंवा होणारा आहेत याचा आढावा घेणं; या क्षेत्रातील सिनियर्स कडून मार्गदर्शन मिळवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रातीन फॅसन्स अथवा मेन्स मॅगझीन्सचं वाचन. विविध वृत्तपत्रांमधून प्रसिध्द होणार्या अश्या विषयांचा कानोसा घ्यावा लागतो”. काही गोष्टी विस्तृत करताना दर्शन असं देखील सांगतो की “कोऑर्डिनेटर सांगतील त्याप्रमाणे स्वत:ला प्रेझेंट करावं लागतं, तर ब्रॅण्ड्सनुसार स्वत:च्या ‘फीजीक’ मध्ये बदल करणं क्रमप्राप्त असतं; तसंच मॉडेलिंग हे क्षेत्र अनिश्चिततेचं असल्यामुळे बॅकअपचा अॉपशन असणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं” तो पुढे सांगतो.
मॉडेलिंग आणि फॅशन विश्वात दर्शन नाईकचं वेगळेपण सिध्द झालं ते ‘फेमिना इंडिया मॅगझीन’ मध्ये झळकल्यावर, त्याचबरोबर ‘मिस्टर क्वालिटी कायोस्क २०१२’,चा किताब ‘मॉडेल्स अर्थ’ या कॉण्टेस्ट मध्ये “मॉडेल ऑफ द वीक” आणि ‘ पॅण्टालून्स फेश फेस ऑफ २०१२ ‘ च्या पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये येण्याचा बहुमान देखील दर्शन ला मिळाला आहे.

अभिनय कलेत आणि ‘फॅशन इंडस्ट्री’त यशस्वी मॉडेल अशी दुहेरी ओळख निर्माण करणार्या दर्शन नाईक हे नाव काही काळातच प्रसिध्दीच्या झोतात येऊ लोकप्रिय होईल एवढं मात्र नक्की.
— सागर मालाडकर
Leave a Reply