दास म्हणो उदास म्हणो
अक्कल दिली देवा
करुनी पुन्हा पाप उजेडी
न करावी सेवा
जिच्याच साठी केले पुण्य
पाप तिचेही घडले
अश्रू जिथे मागती जागा
रक्त तिथेहो पडले….
अर्थ –
दास म्हणो उदास म्हणो, अक्कल दिली देवा
(अध्यात्म, संन्यास, त्याग या सर्व जगण्याच्या कला आहेत. पण या कलांचा वापर करून जर कोणी माणसाला लुटत असेल तर असलेल्या बुद्धीचा वापर होणे आवश्यक आहे. चांगल्या कडून चांगलं घेण्याची सुद्धा बुद्धी व्हावी लागते.)
करुनी पुन्हा पाप उजेडी, न करावी सेवा
(मुखी नामस्मरण करुनि मग काम चुकीचे केले तर त्या नामस्मरणाचा काही उपयोग होत नाही.)
जिच्याच साठी केले पुण्य, पाप तिचेही घडले
(आजच्या काळात अपेक्षा जितक्या जास्त तितके त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे मार्ग ही विचित्र असतात. अपेक्षा पूर्ण करणारा चुकीचा असतोच पण अपेक्षा ठेवणारा जास्त चुकीचा.)
अश्रू जिथे मागती जागा, रक्त तिथेहो पडले.
(यातूनच हलक्या अपेक्षांची पूर्तता करताना सुद्धा गुन्हे घडतात, त्यातून शेवटी मिळते दुःखच.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply