नवीन लेखन...

डासाच्या पुनरउत्पादनाचे जीवनचक्र – भाग १

मानवी रक्त शोषल्यानंतर मादी डास प्रजोत्पादनासाठी अनुकूल होते. नराशी संयोग झाल्यावर मादी साधारण ४० ते ४०० अंडी ही स्थिर अथवा संथपणे वाहाणाऱ्या पाण्याच्या डबक्यात घालते. पाण्याच्या जागेच्या योग्य निवडीसाठी ती स्वत:च्या तापमान संवेदकावरील (Antenna) संवेदना पेशींचा उपयोग करते. अंडी गोड्या वा खाऱ्या पाण्यात तसेच चिखलाच्या छोट्या मोठ्या डबक्यातही वाढतात. डासांच्या उण्यापुऱ्या काही आठवड्यांच्या आयुर्मानात १००० ते ३००० नवीन डासांची फौज निर्माण होऊ शकते.

साधारण दोन दिवसात अंड्यांमधून अळ्या (Larveor Wrigglers) बाहेर पडतात. पाण्यावर तरंगताना त्या शरीरातील छोटया नळी सदृश सोंडेतून श्वासोच्छ्वास करतात. पाण्यातील सेंद्रिय (Organic) पदार्थ व आपलेच कमकुवत असलेले भाऊबंद (Weak Larve) हे त्यांचे खाद्य असते. जीवो जीवस्य जीवनम् !

अळ्यांत चार वेळा उत्क्रान्ती होत होत वाढ होते व त्यातून कोश (Pupa, Tumbler) तयार होतात. त्यांच्या पाठीवर शिंगासारख्या दोन पोकळ नळ्या तयार होतात. ज्यामधून श्वास घेतला व सोडला जातो. अन्नाची गरज नसल्याने त्यांच्यात काहीही हालचाल नसते. ह्या कोशाच्या आत पूर्णावस्थेत तयार झालेला डास व त्याचे भोवती एक पातळ पारदर्शक पडदा असतो. योग्य क्षण आल्यावर तो पडदा फाटतो व नवीन तयार झालेला डास उडण्यास व आपले कार्य सुरू करण्यास सज्ज होतो. हे जीवनचक्र पूर्ण होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो.

मादी डासांचे व सूर्यप्रकाशाचे अगदी वाकडे नाते आहे. साधारणपणे त्यांची माणसाजवळ येण्याची वेळ सायंकाळी ५ ते रात्री १० व पहाटे ४ ते ६ पर्यंत असते. त्यामुळे या वेळात घराची दारे, खिडक्या पूर्णपणे अथवा नेटच्या मदतीने बंद असतील व सोबत तेथे मच्छरदाणीचा वापर सर्रास होत असेल तर डासांना पूर्णपणे मज्जाव करणे शक्य आहे. डासांच्या लपण्याच्या जागा म्हणजे कपाटे व पलंगांचे कोपरे, अंगावरून काढून टांगून ठेवलेले कपडे, अडगळीच्या वस्तू असून या जागा शक्यतो जितक्या कमी असतील तेवढा डासांना वावरण्यास व लपण्यासाठी चांगला प्रतिबंध होऊ शकतो.

अंडी घालण्यासाठी डासांना मनुष्याच्या रक्ताची गरज आहे. परंतु जर मनुष्याने डासांच्या चावण्यापासून कोणताही उदा. मच्छरदाणी वा अन्यमार्गांचा वापर करून बचाव केला तर रक्ता अभावी अंडी टाकता येणार नाहीत या मार्गे डास निर्मूलन मोहीम यशस्वी होऊ शकेल.

डासांमधील बंडखोरी
काही Anopheles Gambiae जातीचे मादी डास मलेरियाचे परोपजीवी आपल्या शरीरात वाढवू न देण्यात यशस्वी होतात व एक प्रकारे आपल्या जमातीशी बंडखोरी करतात. त्यांच्या शरीरात एक वेगळ्या तऱ्हेची प्रतिबंधक शक्ती तयार होते ज्यामुळे मलेरियाचे परोपजीवी त्यांच्या शरीरात वाढू शकत नाहीत. अर्थातच मलेरियाचा प्रसार त्यांच्यामुळे होत नाही.

डासावर उठलेली मानवजात
क्षुद्र मच्छराने माणसाची झोप सर्वार्थाने उडवलेली आहे. त्यांचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळे आधुनिक प्रयोग करण्यात येत आहेत.

१) नपुंसक जातीचे कीटक बनविण्याचे शास्त्र (Sterile Insect Technique) प्रगतीपथावर आहे. नपुंसक बनविलेले नर डास हे डासांच्या समुहात सोडले व जरी मादी डासाशी त्याचा संयोग झाला तरी त्यातून अंडी निर्माण होणार नाहीत. तसेच नर-मादींचे मीलन फक्त एकदाच होत असल्याने एक प्रकारचे कुटुंबनियोजन केले गेल्याने डासांची उत्पत्ती बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.

२) परोपजीवीमध्ये प्रयोगांमार्फत जर (Fluroescent) चकाकणारा पदार्थ मिसळला तर हा परोपजीवी डासांच्या शरीरात शिरल्यानंतर डासही चकाकतील व अशा डासांना ओळखणे त्यामुळे शक्य होऊ शकेल. डासांचा नायनाट करण्याचा मार्ग यातूनही शोधता येईल.

३) माणसाच्या रक्तातून मलेरियाचे परोपजीवी डासांच्या शरीरात शिरतात. त्यांच्या विरुद्ध प्रतिकारक लस शोधून काढून ती लस माणसांना टोचली तर निर्माण होणारी प्रतिपिंड (Antibodies) डासाच्या शरीरात रक्तातून शिरतील. तेथे असलेल्या परोपजीवांचा ते निप्पात करू शकतील. याचाच अर्थ असा की ही डासांविरुद्ध मलेरियाच्या परोपजीवांचा नाश करणारी लस तयार होऊ शकेल. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केल्यास एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न मानवजातीपुढे उभा ठाकून आहे असा की नवीन जन्मलेल्या डासांच्या पिढ्या कोणत्या पद्धतीने नेस्तनाबूत कराव्यात. गेले तीन ते चार दशके D. D. T. या Insecticides चा वापर जगभर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डासांच्या पेशींतील ५० जनुके या कीटकनाशकाला दाद न देण्याच्या प्रक्रियेत साथ देतात.

यामुळे मनुष्य व डास या दोघांमधील हा जीवन – मरणाचा खेळ असाच चालू राहणार आहे.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..