विष्ण्वाद्याश्च पुरत्रयं सुरगणा जेतुं न शक्ताः स्वयं यं शंभुं भगवन्वयं तु पशवोऽस्माकं त्वमेवेश्वरः ।
स्वस्वस्थाननियोजिताः सुमनसः स्वस्था बभूवुस्तत- स्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ २॥
भगवान शंकरांच्या चरित्रातील दिव्य लीला म्हणजे त्रिपुरासुरवध. त्या लीलेचे चिंतन करीत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
विष्ण्वाद्याश्च पुरत्रयं सुरगणा जेतुं न शक्ताः स्वयं – विष्णू इत्यादिक देवता स्वतः ज्या त्रिपुरासुराला मारण्याकरिता समर्थ नव्हत्या. अर्थात स्वतः विष्णू युद्धाला आले तरी तो मरण्याची शक्यता नव्हती अशाच या अतिभयंकर राक्षसाला,
यं शंभुं – ज्या भगवान शंकरांनी मारले त्या शंकरांना, आमचा नमस्कार आहे.
भगवन्वयं तु पशवोऽस्माकं त्वमेवेश्वरः – हे भगवंता आम्ही सर्व पशु आहोत. सामान्य जीव आहोत. आपणच एकटे पशुपतिनाथ आहात.
त्या त्रिपुरसुरा समोर बाकीच्यांची अवस्था सामान्य पशूं समान झाली मात्र आपण पशुपतिनाथ होऊन त्याचा नाश केला असे आचार्य म्हणत आहेत. स्वस्वस्थाननियोजिताः सुमनसः स्वस्था बभूवुस्तत: – त्यानंतर ते संकट दूर झाल्यामुळे अर्थात त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे, त्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या, आपले लोक सोडून जाण्याचे दुःख अनुभवण्याची दुःखद परिस्थिती आल्याने दुःखित झालेल्या, आता ते दुःख दूर झाल्यामुळे ज्यांचे मन शांत झालेले आहे हे अशा सर्व देवता आनंदित मनाने आपापल्या स्थानी , आपापल्या लोकामध्ये सुस्थिर झाल्या.सुख अनुभव लागल्या.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – हे सर्व ज्यांच्या कृपेने घडले भगवान परब्रह्म शंकरांच्या चरणकमलाशी माझे मन सुखाने रममाण होवो. मला तेथेच आनंद मिळणार आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply