(मोरोपंतांची क्षमा मागून. अंतिम पंक्ति त्यांच्याकडून घेतलेली आहे).
चुनावीं, मोठी पार्टी म्हणुन् निवडुन् आलो अम्ही सत्ता हातीं घेण्यांसाठी होती संधी नामी परी, आकडे बहुमताला पडले थोडेसे कमी त्यासाठी कोणां पक्षाची आम्हां हवी होती हमी. विरोधकांची, अपक्ष यांची, म्हणून केली हांजी-हांजी गळास कैसा कोण लागतो, गणितें केली ताजी-ताजी परंतु नाहीं खेळ साधला, सरकार न बनवूं शकलो दात-ओठ चावीत असेंब्लित ‘विरोधी पक्ष’ म्हणुन् , बसलो.
रे दैवा, तव खेळ कसा हा, उधळलीच की बाजी !
अमृतप्राशन करवुन पाजावी काय शेवटी कांजी ?
– सुभाष स. नाईक
Leave a Reply