बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मा. दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते.
खरे तर दशरथ यांना पुजारी शास्त्रीय संगीतात पुढे वाटचाल करायची होती पण विधिलिखित काही वेगळेच होते. पुढे काही गोष्टी अशा घडल्या की ते भावगीतांकडे वळले आणि मग मराठी भावगीतांना एक अवीट गोडीचा गायक आणि उत्तम संगीतकार लाभला. गायक म्हणून त्यांना जास्त संधी मिळाली नाही तरी त्यांनी गायलेली सगळीच गाणी विलक्षण गाजली. त्यामानाने संगीतकार म्हणून तर त्यांची कारकीर्द खूपच भव्य झालेय. मा. दशरथ पुजारी ह्यांनी स्वत: गायलेली गाणी तशी खूपच कमी आहेत. वर सांगितलेले ‘अशीच अमुची आई असती ‘ तसेच ‘ अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ‘ किंवा ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे ‘ हे भक्तिगीत काय, ही सगळी गाणी गाजलेली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची आणि गाजलेली कैक गाणी सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा ह्यांनी गायलेली आहेत.
दशरथ पुजारी यानी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्वीर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. ‘झिमझिम झरती श्रावणधारा’, ‘अशीच अमुची आई असती’, ‘चल ऊठ रे मुकुंदा’, ‘केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत. संगीत-संयोजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात मा. दशरथ पुजारी यांचे सहाय्यक होते. दशरथ पुजारी यांनी ‘अजून त्या झुडपांच्या मागे’ हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले होते. कवी पी. सावळाराम हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना तसेच ‘चतुरंग संगीत सन्मान ‘ पुरस्कार मिळाला होता. दशरथ पुजारी यांचे १३ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दशरथ पुजारी यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=ZUu6bM9ldWc
Leave a Reply