दवबिंदुंचा थेंब पाहे,प्रतिबिंब फुलाचे पाण्यात,
पाणी का आरसा आहे,
प्रश्न पडे त्यास मनात,–!!!
रंग पाहून पाण्याचे,
थेंबही भासे कसा रंगीत,
विविधढंगी रूप असे,
पाहून त्याचा जीव चकित,–!!!
फूल कसे निडर असे,
रंग त्याचे ना बदलत,
पाणीच आपुले रंग बदले,
प्रतिमा त्याची हृदयी ठसवत,–!!!
आखीव-रेखीव पाकळ्यांचे,
बाल- स्वरूप दिसे पाण्यात,
थेंबात परागकण मोठाले,
सारे थेंबाच्या आत डोकावत,–!!!
सगळेच फूल त्यात सामावे, थेंबाला जग लहान भासत,
पाणी खाली उगीच खळाळे दोघांनाही करे परावर्तित,–!!!
थेंबाथेंबाचे जगच निराळे,
भोवतालला कवेत घेत,
जो डोकावे त्यास दिसे,
आपले रुपडे पहा पाण्यात,–!!
आपण खरे आहोत कसे,
छबी तरंगे पाण्यात, हलत,–!!
फुला- थेंबा- पाण्याचे,
विश्व का निराळे असत,–?
आपणास कोण व्हायचे,
चला ठरवू आपण कल्पत,–!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply