परत परत विसरून लक्षात ठेवण्यासाठीच
बरीच वर्ष आपण नुसते ‘डे’ आणि ‘दिन’
साजरे करत आलो !
खरोखरच त्यात ओलावा होता का?
प्रत्यक्ष कृतीतून का नाही दिसत?
आणि लक्षात ठेवले जात त्यांचे महत्व?
का होतो ‘दिन’ दीनवाणा?
आणि ‘डे’ ‘नाईटा’ (काळोखा) सारखा !
सध्या ‘डे’ आणि ‘दीनां’चे
नुसते इव्हेंट होताहेत !
इव्हेंट पुरते लक्षात राहते,
पुन्हा उपड्या घागरीवर पाणी !
ज्यांचे ‘डे’ आणि ‘दिन’ साजरे करतो,
विसरलो त्यांनाच, विसरलो त्यांचा
त्याग, परिश्रम, देशप्रेम, बंधुत्व,
ऋणानुबंधाचे नाते !
आपल्या कृतीतून व्यक्त
होणार नसतील त्यांचे आदर्श
मग कश्याला साजरे करायचे
‘डे’ आणि ‘दिन’ महत्व?
जगदीश पटवर्धन
Leave a Reply