बरोब्बर ९२ वर्षांपूर्वी म्हणजेच १२ मार्च १९३० या दिवशी महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला प्रारंभ केला.
या दांडीयात्रेचा इतिहास खूप काही शिकवून जातो. समुद्र किनाऱ्यालगतच्या गावातले लोक मिठागराचा व्यवसाय करत. त्या वेळच्या ब्रिटिश सरकारला भारतीयांचं हे स्वावलंबित्त्व कसं सहन होणार? त्यामुळे साहजिकच आपला अधिकार दाखवण्यासाठी जुलूम करणे या दबावयंत्राचा त्यांनी वापर केला व भारतीय मीठ उत्पादन बेकायदा ठरवलं. त्यांनी भारतीय मिठागरे बंद केली व स्वत:चं मीठ उत्पादन सुरू करून त्यावर कर बसविला.
‘मीठ’ हा सर्वाच्याच अन्नाचा अविभाज्य घटक असल्याने या गोष्टीचा सर्वाच्याच जीवनावर आणि मानसिकतेवर परिणाम झाला. महात्मा गांधींनी या अन्यायाविरुद्ध असहकार पुकारून लढायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी प्रथम जनजागृती केली.
त्यानंतर साबरमती आश्रम ते दांडी अशी पदयात्रा करायचं ठरवलं. साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर २४० मैल (३९० कि. मी.) इतकं आहे. ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला. या पदयात्रेला दांडीयात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह असेही म्हणले गेले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply