समर्थ नाहीं कुणी, जाणून घेण्या प्रभूला,
थोटके पडतो सारे, घेण्यास त्याच्या दयेला ।।१।।
बरसत असे दया, प्रचंड त्या वेगाने,
दुर्दैवी असूनी आम्हीं, झेलतो फाटक्या झोळीने ।।२।।
असीम होते कृपा, पात्र नसूनी कुणी,
तो बरसत राही सतत, परि आहे सारे अज्ञानी ।।३।।
दयेच्या तो प्रवाह, वाहात राही नदीसारखा,
डुबती कांहीं त्यांत, परि न दिसे अनेकां ।।४।।
नशीब लागते थोर, पेलण्यास दया ती,
जलांत असूनी कांहीं तहानलेली राहून जाती ।।५।।
शिवून तुमची झोळी, प्रथम पात्र व्हा सारे,
सदैव उघडी आहेत, कृपेची त्याची द्वारे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply