करुनी दयेची बरसात
पावन करीतो दुष्टाला
तुझ्या मनाचा ठाव
उमजला नाहीं कुणाला
वाल्या होता खूनी
पापांनी भरले रांजण
परि तुझ्या दयेद्वारे
गेला तो उद्धरुन
कालीदास होता ऐष आरामी
राहात होता वेश्येघरीं
महाकवी बनवूनी त्याला
किमया तूंच करी
बहकला होता पुंडलीक
पत्नीच्या विपरीत नादानें
उभे केले तुला विटेवरी
आईबाप सेवा शक्तिनें
क्षमा करुनी पाप्यांना
पावन तूं करितो
कळले नाहीं आम्हांला
काय कसोटी लावतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply