का ? हा प्रश्न आपण कुणालाच विचारू नये.असे माझे स्पष्ट मत आहे. तसा मी तिलाही कधीच विचारला नाही. कारण तिच्या ‘ अफाट बुद्धिमतेची’ मला आधीच कल्पना आली होती.
खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती. तरीपण त्याचे बऱ्यापैकी नाव होते,चित्रकलेच्या समीक्षेत अर्थात तिला चित्रे काढणे नीट जमत नव्हती.समीक्षकांचे हेच दुखणे आणि हाच प्लेस पॉईन्ट असतो.हे पण तिला माहीत होते फक्त , बडबड्या बिन्धास स्वभावामुळे ती सर्वाना परिचित होती.
फार वर्षांपूर्वी भेटली , आमची मैत्री होती.त्यावेळी मला एका मैत्रिणीची गरज होती.ती गरज ती पुरी करत होती. तिचेही लग्न झालेले होते , आपण नुसते लग्न झालेले असेच म्हणू.माझ्या व्यतिरिक्त तिला बरेच मित्र होते. आम्ही आर्ट वर खूप गप्पा मारायचो , कधीकधी खरेच चागले बोलायची पण कधीकधीच .तिच्याकडे माणसे आकर्षून घेण्याची कला मात्र होती.त्यामुळे ती पार्टीत असताना. हाय-हॅलो करत मिसळून जायची. दोन-चार घोट पोटात गेले की ती माझ्याकडे यायची मी पण शांतपणे पीत बसलेला असायचो.
माझेही बरे चालले होते माझी चित्रे खपत होती.परंतु त्या दाढीवाल्याने मात्र पार मार्केट हलवून ठेवले होते.तो दाढीवाला आणि मी दोस्त होतो , परंतु दाढीवाला जबरदस्तच होता. अर्थात तिचाही तो मित्र होता. हळूहळू आमचे नाते घट्ट होऊ लागले, स्टुडिओत यायची तेव्हा मी तिला मॉडेल बनवायचो.चित्र पुरेसे झाले की बघायला यायची,तिचे ऍबस्ट्रॅक्ट पाहून खूप चिडायची.कारण ते तिचे ऍबस्ट्रॅक्ट असायचे , तिचे चित्र काढताना मला ती तशीच दिसायची.
एकदा तिच्याघरी गेलो ,दोघेही पीत बसलो होतो , समोर समुद्र होता.हळू हळू डोळे जाड झाले आणि बरेच काही..त्या रात्रीनंतर तिचे ऍब्स्ट्रॅकट काढले नाही.कारण तिचे ते रूप भन्नाट होते. त्यानंतर आम्ही रेग्युलर राहू लागली.मी तिच्यात काय पाहिले ते त्या दिवसानंतर मला जाणवले, ती वादळच होती.आणि मी किनारा , धडकावर धडका बसत असत , लाटा फूटत असत आणि किनाराही . पण अशा लाटा किनाऱ्याला हव्याच असतात.तो त्याच अपेक्षेने लाटेकडे बघत असतो….आणि लाट धडकतच असते. त्या लाटेची ओहोटी सहन होत नाही ,मलाही कधीच सहन झाली नाही.तिला काय वाटत होते याचा मी कधीच विचार केला नाही अर्थात तिनेही नाही.
मस्त चालले होते आमचे.आजही ती भेटते , लाटेप्रमाणे . बरे वाटते ,आणखी एक बरे वाटते , त्या समुद्रात एकही ‘ दीपस्तंभ ‘ नाही. त्या ‘ दीपस्तंभाची ‘ नहमीच अडचण असते.उगाच दिशा वगैरे दाखवत बसतो. लाटा अंगावर घेत असताना.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply