बंधन मुक्तीसाठीं असतां, बंधनात ते पाडून टाकी
कर्मफळाचे एक अंग ते, टिपतां राही दुसरे बाकी…१,
साध्य करण्या जीवन ध्येय, देह लागतो साधन म्हणूनी
सद्उपयोग करूनी घेतां, साध्य होईल हे घ्या जाणूनी…२,
हिशोब तुमचा चुकून जाता, तोच देह बनतो मारक
विनाश करितो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख….३,
बंधन पडते आत्म्याभोंवती, शरिरांतल्या वासने पायी
वासनेच्या आहारी जातां, बंधनास ती बळकटी येई…..४,
तपसाधनेचे कष्ट करूनी, देह करितो आत्म्यास मुक्त
देहाचे ते बंधन पडते, जेव्हां बनतो वासनायुक्त…५
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply