शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती ।
आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती ।।१।।
यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी ।
अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी ।।२।।
शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती ।
त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम होती ।।३।।
खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते ।
संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते ।।४।।
उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला ।
हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला ।।५।।
देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे ।
साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे ।।६।।
खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे ।
अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply