गंगाभागिरथी, किनारी
ओलेती सांजाळ केशरी
अस्ताचली बिंब लालगे
गंगाजळी, चैतन्य लहरी
उजळलेली तिन्हीसांजा
मंद, मंद तेवते गाभारी
तनमनअंतर प्रसन्न सारे
गंगौघाच्या शांत किनारी.
आसक्त! अधीर यामिनी
गहिवरलेले प्रीतभाव उरी
शीतल,झुळझुळ लाघवी
मनगंगेच्या, या लाटावरी.
गगनी,घननीळ सावळा
देही, सारेच स्पर्श मयुरी
वेद! मनी, आलिंगनाचे
पुण्यप्रदी,गंगेच्या किनारी
ब्रह्मस्वरूपी, राधा, मीरा
लोचनी, तो श्रीरंगमुरारी
द्वैत,अद्वैताचे रूप मनोहर
घुमते मंजुळ हरिची पावरी
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७०.
४ – ३ – २०२२.
Leave a Reply