

कौतुकपालिकडे.विनम्रता,सेवा,स्वछ्यता,शांतता…एक नंबर..एखाद्या 5 स्टार हॉटेल मध्ये मिळणारी नम्रपणाची वागणूक आपल्याला बघायला मिळते.
खर तर गजानन महाराज ह्यांचे शेगांव संस्थान हे आवल्या जगातभारी आशा नियोजन,शिस्तबद्ध पद्धती,स्वच्छता व सेवकाऱ्यांचा नम्रते साठी सुप्रसिद्ध आहे.एखाद्या कंपनी सारखे नियोजन,खाजगी ठिकाण सारखी स्वच्छता व एखाद्या 5 स्टार हॉटेल मध्ये मिळणारी नम्रपणाची वागणूक आपल्याला बघायला मिळते.शेगाव बद्दल बोलावे असे खूप काही आहे, संस्थान चे इंजिनेरिंग चे कॉलेज,हॉस्पिटल,रोज हजारो चा संख्येने मिळणार जेवण (महाप्रसाद), सुमारे 200 एकर मध्ये असलेले आनंद सागर उद्यान व त्यासाठी असलेली माफक फी,भक्तांसाठी सर्व सुविधांयुक्त भक्तनिवास(राहण्याची वव्यवस्था) व सांगावे तेवढे कमीच.आज शेगाव येथे ११,००० पेक्षा जास्ती सेवकरी प्रतीक्षा रांगेत उभे आहेत. सेवा ज्यात कोणतंही मानधन दिलं जात नाही तर सेवा संपल्यावर एक प्रसादाचा नारळ घेऊन सेवेकरी आपल्या पुढच्या मार्गाला प्रस्थान करतो. १७,००० पेक्षा जास्त सेवेकरी आज शेगाव संस्थानात अश्या प्रकारे निस्वार्थी सेवा देतात.

ही सेवेकरी मंडळी इतकं चांगलं आणि प्रामाणिकपणानं कसं वागू शकतात? असा प्रश्नही पडतो. चांगल्या, निरपेक्ष वृत्तीनं, सेवाभावानंदेखील या जगात वावरता येतं हेच .त्यांना सुचवायचं आहे काय? हे संस्थान आपलं आहे,आपल्या महाराजांचं आहे..रात्री दहा नंतर येणाऱ्या भाविकांसाठी मोफत जेवण असते. विशेष म्हणजे आग्रह करून वाढतात. अत्युत्कृष्ट व्यवस्थापन आणि कमालीची स्वच्छता.
या संस्थानाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. मॅनेजमेंट अतीशय उत्कृष्ट आहे. या थाळीत प्रेम व आशीर्वाद आहेत,,जय गजानन माऊली..
शेगाव सारखे धार्मिक स्थळ क्वचितच असेल.
— संतोष द पाटील
Leave a Reply