डेनीस ब्लोशचा जन्म पॅरिस मध्ये २१ जानेवारी १९१६ रोजी पॅरिस येथे एका ज्यू कुटुंबात झाला.तिला तीन भाऊ होते. १९४० मध्ये त्यापैकी दोन भाऊ व वडील फ्रेंच लष्करात होते. त्यांना १९४० मध्ये जर्मनांनी तुरुंगात टाकले.ती,तिची आई व एक भाऊ तुरुंगवास टाळण्यासाठी खोटी ओळख व कागदपत्रे मिळवून भूमिगत आयुष्य जगत होते. जुलै १९४२ मध्ये त्यानी जर्मनांच्या ताब्यातील फ्रांस मधून विनसी फ्रांस मध्ये पलायन केले.तिथे तिची ओळख सिट्रॉन या ज्यू इंजिनियरशी झाली तो फ्रेंच क्रांतिकारी संघटना व एसओई संघटनेसाठी काम करत असे. ब्लोशने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला. एसओईने तिला वायरलेस ऑपरेटर चे प्रशिक्षण दिले.
ती गुप्तहेर जॉर्ज स्टार याच्या बरोबर त्याला अटक होईपर्यंत रेडियो ऑपरेटर म्हणून काम करत होती..ती एसओईच्या एजंट बरोबर काम करू लागली.तिला पुन्हा लंडनमध्ये आणण्याचे ठरवले.ती पायरनेस डोंगररांगेतून, जिब्राल्टर प्रांतातून वाट काढत लंडनला पोहोचली. २ मार्च १९४४ रोजी एसओई एजंट रॉबर बेनोट बरोबर विमानातून फ्रांस मध्ये उतरवण्यात आले. १८ जून १९४४ रोजी ती व तिचा साथीदार बेनोस्त यांना सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी जर्मन सैनिकानी अटक केली. तिला सेकसोनी येथील टोरगा तुरुंगात डांबण्यात आले. तिथे तिचे थंडी आणि कुपोषण यामुळे अतिशय हाल झाले. पुढे तिला रेवनबर येथील यातनातळा वर पाठवण्यात आले. ५ फेब्रुवारी १९४५ रोजी तिला ठार करण्यात आले तेव्हा ती केवळ २९ वर्षाची होती.इंग्लंड कडून तीन व फ्रांस कडून तीन अशी तिला सहा मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले.
–रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply