असा देशभक्त वैज्ञानिक
एकत्र आणि गरिब
कुटुंबात जन्माला आला,
लहानपणी कष्टाला,
पण शिक्षणचा ध्यास नाही सोडला,
त्यासाठी पेपरही विकला,
डिग्र्या आणि सन्मानांचा गर्व नाही झाला !
असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने
वडिलांच्या संस्कारांचा आणि
थोरामोठ्यांच्या सल्याचा आदर केला !
असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने आयुष्यभर
फक्त देशासाचे हीत बघितले
देशासाठी काम केले !
देशाला आंतरीक्ष आणि
अणू विज्ञान-तंत्रज्ञानात अग्रेसर ठेवले,
विविध मिसाईलचे शोध लाऊन,
मिसाईल मॅनचे आभूषण स्वीकारले !
देशभक्त वैज्ञानिक
पुढे देशाचा राष्ट्रपती झाला,
संपत्ती नाही जोडली
पण माणसं जोडली !
असा देशभक्त जो आयुष्यभर
असंख्य विद्यार्थ्यांशी संवाद साधता साधता
स्वत:ही त्यांचा चांगला मित्र झाला !
विद्यार्थ्यांनां हिताच्या अनेक गोष्टी सांगता सांगता
स्वत:च्या कृतीतून, विचारातून आणि आदर्शातून
पंचत्वात विलीन झाला !
अश्या देशभक्ताचे नावं
सुवर्णाक्षरात लिहिले गेले,
भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply