प्रियंका चोप्राची गणना बॉलिवूडच्या आघाडींच्या नायिकांमध्ये केली जाते.
प्रियांकाचा जन्म १८ जुलै १९८२ रोजी जमशेदपुर येथे झाला. चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रियांकाला सिंगिंगमध्ये करिअर करायचे होते. मात्र मिस वर्ल्डचा किताब २००० मध्ये जिंकल्यानंतर प्रियांका चित्रपटांकडे वळली. त्यामुळे म्युझिक बॅकफूटवर गेले.
प्रियांकाचे वडील भारतीय सेनेत डॉक्टर होते. २००२ मध्ये तमीळ चित्रपट थमिजहन या चित्रपटात काम करुन तिने चित्रपट सृष्टीत आगमन केले. प्रियांकाने आत्ता पर्यत क्रिश, फॅशन, सात खुन माफ, अग्नीपथ, बाजीराव मस्तानी असे हिट सिनेमे दिले आहेत. प्रियांकाने आता हॉलीवुड मध्ये पण काम करण्यास सुरुवात केली आहे. ‘क्वांटिको’ या मालिकेतून हॉलिवूडमध्ये पॉप्युलर झालेल्या प्रियंकाला आता हॉलिवूडपटांच्या आॅफर्स येत आहेत. ‘बेवॉच’ या चित्रपटात झळकल्यानंतर तिने ‘अ किड लाइक जेक’ या दुसर्या हॉलिवूडपटाची शूटिंग पूर्ण केली. आता ती तिच्या तिसऱ्या ‘इसिंट इट रोमॅण्टिक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती एका हॉलिवूडपटाच्या निर्मितीचाही विचार करीत आहे.
ती बॉलिवूडमधून गायब झाल्याने बऱ्याच काळापासून ती बॉलिवूडपटात झळकलेली नाही. बॉलिवूड चित्रपटांचा विचार केला तर, ‘जय गंगाजल’ चित्रपटानंतर प्रियांकाने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. पण प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीचे काम सध्या ती करत आहे.
तिच्या प्रोडक्शनमध्ये भोजपूरी चित्रपट ‘बम बम बोल रहा है काशी’, मराठी चित्रपट ‘वेंटिलेटर’, पंजाबी मूवी ‘सरवन’ हे रिलीज झाले आहेत. सध्या मराठी चित्रपट ‘काय रे रास्कला’ आणि सिक्किम चित्रपट ‘पहुना’ अंडर प्रोडक्शन आहे. प्रियांकाची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply