साबण वापरत असलो तरी साबण व डिटर्जंट यात फरक असतो. साधारणपणे डिटर्जंट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट धुण्यासाठी जे रसायनयुक्त द्रव वापरतो त्याला डिटर्जंट असे म्हणतात. ग्रीस किंवा इतर कुठलेही चिकट डाग त्यामुळे निघतात. पहिले सरफॅक्टंट जर्मन रसायनसास्त्रज्ञ फ्रान्झ गुंथर यांनी १९१६ मध्ये शोधून काढले व त्यातून डिटर्जंटचा जन्म झाला. साबण हा केवळ एकाच प्रकारचा रासायनिक पदार्थ असलेला डिटर्जंट असतो.
केसाला लावण्याच्या शाम्पूपासून वॉशिंग पावडरपर्यंत सगळ्यात डिटर्जंट वापरले जातात. शेव्हिंग फोम व स्टेन रिमुव्हर्समध्येही ते असतात. आपण जेव्हा स्नान करतो त्यावेळी आपण ओले होतो. पण खरेतर तसे नसते, आपण पूर्ण ओले होत नाही. पृष्ठीय ताणामुळे हे घडून येते. पाण्याचे रेणू हे त्यांना योग्य अशा रेणूंची संगत शोधतात व थेंबाच्या रूपात चिकटून राहतात. जेव्हा खिडकीवर पावसाचे पाणी पडते, त्या वेळी खिडकीची काच कधीच समान प्रमाणात सगळीकडून ओली होत नाही. पाण्याचे थेंब तावदानावर चिकटून राहतात व गुरुत्वामुळे ते ओघळत जातात.
पाण्यामुळे अंग धुण्याची किंवा एखादी वस्तू धुण्याची क्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी पृष्ठीय ताण (सरफेस टेन्शन) कमी करावा लागतो. त्यामुळे पाणी चांगले लागावे लागते. डिटर्जंटमधील सरफॅक्टंट या घटकामुळे पाणी अंग चांगले ओले करते किंवा एखाद्या वस्तूला खऱ्या अर्थाने पाणी लागते. त्यामुळे तो पृष्ठभाग स्वच्छ होण्याची क्रिया अधिक प्रभावीपणे होते. डिटर्जंट टाकल्यानंतर पाणी कपड्यांच्या धाग्यांपर्यंत चांगलेच पोहोचते व मुरते.
सरफॅक्टंटच्या रेणूचे एक टोक पाण्याकडे तर दुसरे घाणीकडे किंवा ग्रीसकडे आकर्षित होते. त्यामुळे सरफॅक्टंटचे रेणू पाण्याला घाण ओढून काढण्यास मदत करतात. कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले तर ही क्रिया आणखी प्रभावीपणे पाण्याचे थेंब तावदानावर चिकटून व राहतात गुरुत्वामुळे ते ओघळत व कमी कष्टात होते. डिटर्जंटमध्ये सरफॅक्टंट हे एकच रसायन नसते, तर त्यात कपडे सूर्यप्रकाशात चमकदार दिसतील असे ब्रायटनर्स असतात. जैविक डिटर्जंटमध्ये विकरांचा वापर केलेला असतो.
ते कपड्यावरील घाण बाहेर काढण्यास मदत करतात. प्रोटिअॅसेस प्रोटिन्सला मोडून काढतात, लिपॅसेस मेदाला मोडून काढतात, अमायलॅसिस स्टार्चवर हल्ला चढवतात. लिमोन नावाची सुवासिक द्रव्येही त्यात असतात. सोडियम कार्बोनेट हे पाणी सॉफ्ट करण्यासाठी वापरतात. लिनिअर अल्काईन बेन्झीन सल्फोनेट हे डिटर्जंट जास्त वापरले जाते.
अल्काईन अमोनियम क्लोराईड अधिक प्रभावी डिटर्जंट असते . हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर ब्लीचिंगसाठी केला जातो. फॅब्रिक सॉफ्टनर म्हणून डायएथिल एस्टर डायमेथिल अमोनियम क्लोराईड वापरतात. कपड्यांनी पुन्हा मळ पकडू नये यासाठी पॉलिएथिलिन ग्लायकॉल कार्बोक्सी मेथिल सेल्युलोज वापरतात.
Leave a Reply