नवीन लेखन...

देव ही संकल्पना

त्यांच्या समोर नतमस्तक होऊ लागले. इतिहास सांगतो की, राजसत्ता ही धर्मसत्तेला प्रचंड महत्व देवू लागली. काहीतरी करुन दाखवण्याची शक्तीप्राप्त लोक हे विचार, कल्पना, भव्यता, दिव्यता इत्यादी संकल्पनाना शरण जावू लागले. ह्यामधूनच एक वर्ग निर्माण झाला. जो आपल्या ज्ञानांनी ज्यात अदृष्य शक्तीची गुणगाण, वर्णन, परिणाम, प्राप्त करण्याची साधने, मार्ग इत्यादी अनेक मार्गाचा उहापोह करु लागला. काही मिळणे वा न मिळणे, प्रयत्नांना यश येवो वा न येवो हे सारे नैसर्गिक सत्य आहे व चक्रमय आहे. परंतु एखाद्या प्राप्त घटनेला कुणाच्या तरी दयेचा, अदृष्य शक्तीची देण ह्या संकल्पनेत घालून विचारांना त्यापद्धतीने मार्ग क्रमण करण्यास प्राप्त केले जाते. तसा विश्वास निर्माण केला जातो. येथेच जन्म होते. श्रद्धा हा संकल्पनेचा. सहजता, साधेपणा, दिव्यता, महानता, चांगलेपणा ह्या कल्पनेला विरोध होत नसतो. ती मानसिकता असते. तीच अशा लोकांनी हेरली आणि आत्मसात केली. आजही असेच शारिरीक अशक्त वा किरकोळ परंतू ज्ञान संपन्न व्यक्ती सर्व समुदायात आपले स्थान प्राप्त करत असतात.

शक्तीचाच नेहमी विजय होत असतो. “ज्ञान” ही पण एक शक्ती आहे. तिने आपल्यापरी अस्तित्व स्थापन केले आहे. मूळ मानसिकता हा नैसर्गिक गुणधर्मात दडलेला आहे. जीवनाची गरज, ती अंकीत राहते. संरक्षणात, अस्तित्वाच्या काळजीत सर्व सजीवाची प्राथमिक गरज असते. ती दिलेले, मिळालेले जीवन जगण्याची  “सर सलामत तो पगडी पचास” म्हणण्याची एक वाक्यरचना त्यामुळे आणि त्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. कोणतीही शक्ती तुम्हास तारेल हा विचार मनावर प्रचंड परिणामकारक ठरतो. अर्थात त्या तरण्यातच त्याच अदृष्य शक्तींकडून मिळवायचे असते. त्या जीवनाला लागणाऱ्या गरजा मग ते हवा, पाणी, अन्न ह्या प्राथमिक वा कपडा, घर, संसार इत्यादी जीवनाच्या सोई हे सारे कोणतीही अदृष्य, प्रचंड शक्तीप्राप्त संकल्पनेमधून साध्य होऊ शकते हा विचार मनास आनंद व समाधान देणारा ठरतो. त्यास वैचारिक मान्यता त्वरीत मिळते. त्याच संकल्पनेमधून उत्पती झाली त्या शक्तीच्या प्राप्तीची, आशीर्वादाची, दयेची इत्यादी.

ज्या विद्‍वान मंडळींना अनेक चांगले, सुंसकृत असे विचार येवू लागले. यांनीच त्यांच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सुचविले. निरनिराळ्या विचार धारा निर्माण होऊ लागल्या. अनेक मार्ग अनेक पंथ इत्यादी त्यामधून उत्पन्न झाले. ज्यांना जशी समज येवू लागली. ते ते त्या त्या विचार धारणेकडे वळू लागले. ह्या सर्वांचा वेगवेगळा परिणाम होऊ लागला. मात्र मूळ गाभा कायमच राहीला. तो म्हणजे श्रेष्ठत्वाचा. प्रत्येक जण आपला विचार श्रेष्ठ, प्रथम, महान, प्रगल्भ इत्यादी असल्याचे सांगू लागले. भासवू लागले. कारण श्रेष्ठत्वात होता अधिकार, सत्ता गाजविण्याची क्षमता.

काही विचार करताना, ह्या विचारांना छेद जाईल अशा कल्पना काढल्या. जशा चांगल्या अदृष्य शक्ती असतात, तशाच त्रासदायक, तापदायक, हानीकारक देखील शक्तींचा उहापोह झाला. भूताटकी, चेटूक, चकवा, भूतबाधा, पिशाच्य, राक्षसी वृत्ती इत्यादींच्या कल्पना पुढे आल्या. त्याच्या भयावह शक्तीसामर्थाच्या वर्णनाने अनेकजण हाबकून  गेले. अशा वृत्तींना देखील अंकीत करावे, त्याचीपण दया मिळावी. कृपादृष्टी असावी ही विचारसरणी पण जोर धरु लागली. ह्या साऱ्यांचा वेगळाच मार्ग शेवटी जात होता. आपले श्रेष्ठत्व दुसऱ्यावर स्थापन करण्याचा प्रयत्नात, अनेकजण त्यातही अयशस्वी झाले. चांगले असो वा वाईट, सर्वानाच अंकित करुन स्वरक्षण करुन घेण्यालाच त्यात यश मिळत गेले. अनेक उलाढाली, अनेक घटना अनेक प्रसंग चक्रमय रुपात चालतात. ज्यात उत्पती स्थिती व लय हे सुत्र अबादित आहे. मानवाने आपल्या अहंकारी बुद्धीने त्यात खूप विघ्ने, वितुष्ट, बदल करु घातले. त्या सर्व शक्तीमान निसर्गाला (का परमेश्वराला) आपल्या इच्छेप्रमाणे बदल करण्यास भाग पाडले. जे काही दिसू लागेल, भासले, वाटले ते सारे मिथ्या होत चालले आहे. फार क्षणीक बदल ही तर निसर्गाचीच योजना आहे. उत्पत्ती, स्थिती व लय ह्यावर देखील मानव अधिकार गाजविण्याचा प्रयत्न ह्या मधून होता.

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..