ती आपली ज्ञान शक्ती व्यक्त करताना, वृद्धींगत करताना, दिसते. हे फक्त ज्ञानच करु जाणे, मनाला हे कितपत जमेल ह्याची शंका वाटते. कारण ते मन कोणत्यातरी वैयक्तीक देहामध्ये बंदीस्त असते व देहाला नाश होण्याचा शाप आहे. काळ वेळ ह्यांचे मिलन होताच देहधर्म नष्ट होतो. लहरी रुपी ज्ञान छलांग मारीत दुसऱ्या देहांत शिरते व चक्रमय गतीत जाते.
शेवटी पूर्वीचाच प्रश्न समोर येतो व त्याची सोडवणूक पण तशीच होते. हे सारे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच. श्रेष्ठत्वात सत्ता, सत्तेत जीवन जगण्याचे मार्ग हे असतात आणि सारे कशासाठी तर “मी” ह्याच्या साठी
रानटी अवस्थेपासून “मी” चा जो उगम जाणवू लागला तो नैसर्गिक होता व केवळ चांगल्या अस्तित्वासाठी struggle for existence म्हणतात तसे
केव्हा केव्हा मनात विचार येतो की देवत्व कोठे, ह्याच जगांत नव्हे का? ज्याने स्थूलत्व व सूक्ष्मपणा ह्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी केला, नवीन सजीवता निर्माण केली, देह व देहातील अवयावर ताबा केला. ह्याला कोण म्हणावे, पूर्व काळातील देवत्वाच्या सर्व संकल्पना मानवात जर दिसून येत असतील, तर तोच देव असेल का?
ह्याच क्षणी म्हणजे देवाच्या कालसमयी दैत्याची पण संकल्पना होती.
केवळ चांगले व वाईट ह्या भावनांना उचलण्यासाठी देवाबरोबर दैत्याची संकल्पना रुढ केली गेली. आज देखील अनेक व्यक्तींचे आचरण हे दैत्याच्या संकल्पनेत जाते. हे सत्य आहे. म्हणून देव आणि देत्य ह्या दोन्हीही कल्पना आज मानवात दिसून येतात. येथेच स्वर्ग असतो. येथेच नर्क असतो म्हणतात. हे गुढ अर्थानी समजून घेतले पाहीजे. अंगीकारले पाहिजे. ह्यामुळे वैचारिक भरकटने, गैरसमज, गैरविश्वास व अंधश्रद्धा यावर पायबंद पडू शकेल. मानवाच्या ज्ञान प्रगतीमध्ये संस्कारीत, आदर्शवादी, भक्ती प्रेमभरीत, समानतायुक्त भावना अशा मुल्यांची नितांत गरज आहे. दैत्य वृत्तीला जाणून, सर्वांनीच देवत्व होण्याची आज जगाला नितांत गरज आहे. मानवाचा देव व्हावा हीच त्या परम् श्रेष्ठ परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply