देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,
झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।
जाई जेव्हां मंदिरी,
घेतां प्रभू दर्शन,
आनंदानें नाचते,
हर्षित चंचल मन,
नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।
नदीनाले धबधबा,
उंच उंच वृक्ष वेली,
कोकीळ गाती, मोर नाचे,
इंद्रधनुष्याच्या खाली,
रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।
दु:खी – कष्टी दुबळा,
दीनवाणा दिसे,
प्रभूच्याच आज्ञेने,
भोग भोगीत असे,
जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply