देवांच्या जन्मकथा ही काव्यमालिका सुरु करत आहोत. हिंदू संस्कृतीतील देवांच्या या जन्मकथांना पद्स्वरुपात साकारलंय. मालिका सुरु करण्याआधी सर्व देवांना हे नमन !
नमन माझे श्री गणेशाला
वंदितो मी कुलस्वामिनी श्री रेणुकेला
भाव अर्पितो गुरु दत्तात्रयाला
परमात्म्याची विविध रुपें ।।१।।
परमेश्वराची लीला महान
घ्यावी सर्वानी जाणून
टाकून सारे ब्रह्मांड व्यापून
चालवितसे खेळ जीवनाचा ।।२।।
विश्वाचा तो अधिनायक
जीवन धर्माचा तो पालक
जीवन गाड्याचा तो चालक
परब्रह्म परमात्मा ।।३।।
नसे त्यासी मृत्यु- जन्म
कार्य करी तो अवतार घेऊन
कुणामध्यें अंशरुपे येऊन
जीवनचक्र चालूं ठेवी ।।४।।
प्रभूसी समजावे समर्थ
जाणून घ्यावा जीवन अर्थ
हेच आयुष्याचे सार्थ
आपल्या जीवनाच्या ।।५।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१-१५११८३
Leave a Reply