नवीन लेखन...

भक्तीरसाने ओथंबलेली नवी गाणी (विनोदी लेख)

‘कामावर जायला उशीर झायला… ‘
‘वाट बघतोय रिक्षावाला…’
‘बीडी जलैले…’
‘आवाज वाढव DJ….’
‘पप्पी दे… पप्पी दे पारुला’
‘झिंग झिंग झींगाट….’
‘येडं लागलं…’
‘DJ वाले बाबू मेरा गाना बजाओ…’

भक्तीरसाने ओथंबलेल्या या गाण्यांच्या भक्तीमय वातावरणात गणोशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती व इतर सणांच्या काळात विविध चित्रपटांची गाणी वाजवली जातात…

त्याचा अनेकांना त्रास होतो….!

खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो…

ही गाणी समजावी व आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न….

कामावर जायला उशीर झायला…
वाट बघतोय रिक्षावाला…

…अतिशय भावपूर्ण गाणं आहे!

अर्थात या धकाधकीच्या जीवनात कोणतीही गोष्ट सरळ होत नाहीय… माझी सगळी गणितं चुकताहेत… आपल्याला उशीर झाल्यावर ,घाईत असताना आपण रिक्षावाल्याला शोधत असतो पण तोही पुढे जातो आपल्याला नाकारतो… प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत… आपल्याकडे बघत असतो..त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं… त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही…!

बिडी जलैले जिगर से पिया…
जिगर मा बडी आग है…

…अर्थात… या हृदयात भगवंताच्या भेटीची आग पेटली आहे… या आगीच्या धगीचा… अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे… भगवंताच्या भक्तीने माझ्या हृदयात लागलेली आग इतरांच्या जिगर मध्ये म्हणजे बाॅडीत ‘बीडी’ अर्थात आग फुंकण्याचं काम करत आहे…!

आवाज वाढव DJ
तुला आईची शप्पथ आहे…

अर्थात… या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनातला आवाज क्षीण झाला आहे… हे DJ म्हणजे… भगवंता हा आवाज वाढव… मला आत्मबळ दे… तुझ्याशी तादात्म पावण्यासाठी माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर… हे भगवंता हे जर तू करणार नसशील तर हे जगनियंता असलेल्या आईची तुला शपथ आहे… माझा जीव तळमळतोय…!

पप्पी दे… पप्पी दे पारुला

…अर्थात… हे भगवंता मी कितीही मोठा झालौ असलो तरी तुझ्या समोर लहानच आहे… श्लील-अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर… जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे… मला तो निरागस भाव दे…!

झालंय झिंग झिंगाट…

…अर्थात… देवीची आरती चालू असताना कसं भगताच्या अंगात येतं… तसं तुझ्या आगमनानी आणि त्या आनंदाने कोणताही नशीला पदार्थ न घेता झिंगाट झालोय देवा…!!!

येड लागलं…

…अर्थात भगवंताच्या भक्तीत लोकं इतके वेडे होतात घर दार संपत्ती माया मोह सगळे पाश तुटले जातात अन् तुझं याड लागतं…!!!

‘DJ वाले बाबू मेरा गाना बजाओ…

अर्थात… भगवंताला अत्यंत कळकळीने सांगीतले आहे या भावगीतामध्ये की… डीजे वाले म्हणजे भगवंत…
भगवंता माझी प्रार्थना तुझ्या हृदयापर्यंत पोहोचावी म्हणून तूच माझ्या मुखी विराजमान हो आणि तूच म्हण तुला जे हवं…!!!

हे भाव जागवत गणेशोत्सवातील गाणी ऐका… म्हणजे आता त्रास होणार नाही…!!!

*”मोरया…sss”!!!*

— प्रकाश तांबे 

(Whats App च्या ज्ञानवाटपकेंद्रावरुन मिळालेलं अगाध ज्ञान….. )

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..