रीडर्स डायजेस्टचे जनक डेवीट वॅलेस यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८९ रोजी उत्तर अमेरिकेतील मिनेसोटा प्रांतातील सेंट पॉल येथे झाला.
कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर डेवीट वॅलेस यांनी लागलीच एका प्रकाशन संस्थेत नोकरी धरली. शालेय पुस्तके प्रकाशित करणारी ती संस्था होती. तेथेच त्यांना वाचनाचा नाद लागला. हाती येईल ते पुस्तक वाचण्याचा त्याने सपाटा चालविला.
सर्व जगातील विविध क्षेत्रातील घडामोडी समजण्यासाठी खूपच पुस्तके वाचावी लागतात, त्याऐवजी सारांश रूपाने एकाच पुस्तकात सर्व मजकूर छापला तर मोठीच सोय होईल, ही कल्पना व्हॅलीला त्यावेळी सुचली, आणि त्याच्या डोक्यात कायमचे ठाण मांडून बसली व ५ फेब्रुवारी १९२२ साली पहिले रीडर्स डायजेस्ट प्रकाशित झाले.
डेवीट वॅलेस यांचे ३० मार्च १९८१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply