ढळले ढळले जल ते
नेत्री समर्थे दाटले
सुखाश्रू किती न रडणे किती
कुणी विचारले!!
अर्थ–
समर्थांचे चरित्र वाचताना, अभ्यासताना अनेक चमत्कारिक गोष्टी पुढे येतात, अचंबित करणाऱ्या घटना सापडतात पण, समर्थ किती वेळा रडले, याची नोंद कुठेही नाही. आता एखादी व्यक्ती रडली तर त्याची कोण नोंद ठेवेल? नोंदी ऐतिहासिक गोष्टी, महत्वाच्या घटना, पुढे उपयोगात येणाऱ्या गोष्टी यांच्या केल्या जातात. त्यात कुणी रडलं, अमुक वेळा, अमुक वाजता हा किंवा ही रडली अशी नोंद कोण कशाला करेल?
पण आनंदाश्रू डोळ्यांमधुन आल्याची नोंद मात्र केली जाते. प्रभू श्रीराम यांचे दर्शन झाले तेव्हा नारायणाच्या डोळ्यांमधुन घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले, रयतेचा राजा, जाणतारेणू राजा छत्रपती झाला तेव्हा प्रतापगडावर असलेल्या श्री समर्थांच्या नेत्रांमधून सुखाश्रु वाहू लागले होते, गावात कुणी मोठा कीर्तनकार, अध्यात्माचे अगाध ज्ञान प्राप्त असलेला कुणी योगी आला आहे अन तो दुसरा कुणी नसून माझा नारायणच आहे हे जेव्हा राणू बाईंना समजले तेव्हा त्यांचा बांध फुटला तो प्रेमाच्या आनंदाश्रूंनीचं.
आपण कोणा मूळे रडलो यापेक्षा कोणामुळे आपण सुखी झालो हे समजण महत्वाचं आहे. आपल्या डोळ्यात किंवा आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू कोणते येतायत हेही जर समजले तर इतिहासात नोंदी कशाच्या होतात हे सर्वांना ठाऊक आहेच.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply