अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात.
धर्मशास्त्रानुसार यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ करतात. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा करतात.
हे व्रत अपमृत्यू टाळण्यासाठी केले जाते. या व्रताच्या कथेत यमराजाने सांगितले आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान हे व्रत करेल त्याला अपमृत्यू येणार नाही.
याच दिवशी आयुर्वेदाचे प्रवर्तक भगवान धन्वंतरींची जयंती असते.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply