कांपू नकोस धरणीमाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।। धृ ।।
जागो जागी अत्याचार सर्वत्र दिसे भ्रष्टाचार
वाढले भयंकर अनाचार
गरीब जनता त्रस्त होऊनी जाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।१।।
रक्षण नाही स्त्रियांचे प्रमाण वाढले बलात्काराचे
प्रकार घडती विनयभंगाचे
हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।२।।
लुट लुट संपत्तीची जाळपोळ घरदारांची
खून पाडती अनेकांचे
प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।३।।
गीतेमध्ये दिले वचन अर्जुनासी प्रभूचे तोंडून
प्रभूचे होईल पुनरागमन
अत्याचार वाढता जगाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।४।।
शब्द आपला पाळूनी येईल तो अवतार घेउनी
सुखी करील दु:ख नाशूनी
विश्वास ठेवा गीतेतील शब्दाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।५।।
ठेवा निर्मळ देह आणि मन पवित्रतेचे करा वातावरण
टाळू नका ह्या स्वागत संधीते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।६।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply