मुंबईतल्या धारावी येथील, गरीब मुलांना संगीत विषयाची गोडी उत्पन्न व्हावी तसंच संगीत वाद्य शिकता यावीत किंवा या विषयासाठी रुची असणारे लहानगे वंचित राहू नयेत व या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा विचार करणार्यांसाठी संगीत गुरुकुल ट्रस्ट म्हणजे आशेचा किरण म्हणावा लागेल.
धारावी येथील इंदिरा नगरच्या गुरुकुल ट्रस्टने जानेवारी २०१२ पासून गरिब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कमी किमतीत शिकता यावे या उद्देशाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. दर रविवारी संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत चालणार्या संगीत शिकवणी मध्ये अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच “बासरी”, “गीटार”, “कीबोर्ड” व अन्य वाद्यांची शासत्रोक्त माहिती, व ती हाताळण्याची संधी दिली जाते हे विशेष!
— सागर मालाडकर
Leave a Reply