संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. एकदा आषाढीच्या वारीसाठी पैठणहून दिंडी निघाली. त्या दिंडीत एकनाथ महाराज ही होते. वाटेत एका गावी दिडींचा रात्रीचा मुक्काम होता. त्या गावातील एका गावकर्याला संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. मात्र दिंडीत एवढे असंख्य लोक होते, की आपल्याला त्यांचे दर्शन कसे मिळणार व आपण त्यांना ओळखणार कसे? हाच प्रश्र्न त्याच्यापुढे पडला. शेवटी त्याने एक युक्ती केली. गावात असेलल्या आंब्याच्या झाडाची दोन-तीन पाने तोडली व तो दिंडीच्या ठिकाणी गेला. तेथे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत त्याने काही लोकांना ती आंब्याची पाने दाखविली व म्हणाला, ” पाहा, आमच्या गावातील चिंचेच्या झाडाची ही पाने किती मोठी आहेत.’ ‘ त्यावर लोकांनी त्यालाही चिंचेची पाने नसून आंब्याची पाने आहेत असे सांगून त्याला वेड्यात काढले. मात्र तो गावकरी ज्याला त्याला ही चिंचेचीच पाने आहेत असे ठामपणे सांगू लागला. त्यामुळे त्याच्याभोवती प्रचंड गर्दी जमली व लोक त्याच्याशी हुज्जत घालू लागले. संत एकनाथ महाराजांनाही ही गोष्ट कळली व ते स्वतःच तेथे आले व त्या गावकर्याशी वाद घालणार्या लोकांना म्हणाले, ‘ ‘ईश्वराने वृक्षवीची निर्मिती करताना काही त्यांना नावे दिली नव्हती. आपल्या सोयीसाठी आपण झाडांना तशी नावे दिली आहेत. त्याच्या गावात जर चिंचेला आंबा म्हणत असतील, तर म्हणून द्या. तुम्ही त्याच्याशी निरर्थक वाद घालून तुमचा वेळ निष्कारण वाया घालवू नका. तोच वेळ तुम्ही नामस्मरणात किंवा संतांचे चांगले विचार ऐकण्यात घालवा. ” त्या गावकर्याला त्याचक्षणी संत एकनाथ महाराजांची ओळख पटली व हाच खरा धर्मात्मा हे ओळखून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply