नवीन लेखन...

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।।

संसारांत रमलो   मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे  समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।।

हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।

हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज   उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।

हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति    ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।

हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण    तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।

हेच साधले ध्यान लावूनी

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..