होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन करतात. सकाळी स्नान करुन दुष्ट कलांचा नाश होण्यासाठी ‘वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेण च । अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ हा श्लोक म्हणून राखेला वंदन करावे. याने अधि व व्याधींची पीडा होत नाही. अधि म्हणजे मानसिक व्यथा, चिंता, आणि व्याधी म्हणजे रोग.
या दिवशी शहरांत सर्व लोक कोणत्याही प्रकारचे रंग एकमेकाला लावतात. यात अगदी ऑईल पेंटपासून वापर केला जातो. हे सर्व चुकीचे आहे. या सर्व रंगांमुळे व्याधी निर्माण होण्याची शक्यता फार आहे. या प्रथा (जीवावर बेतणाऱ्या) त्वरीत बंद होणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत व्याधी बऱ्या होण्यासाठी निरनिराळे मार्ग उत्सव सणांमध्ये सांगितले आहे. आपण करीत आहोत ते व्याधी निर्माण करणारे आहे.
रंग उडवायचेच असतील तर ते रंगपंचमीला उडवावे. तेही ज्यांनी हानी होणार नाहीत असेच उडवावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणे हितावह आहे.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply