मना ध्यास तुझा
भास चराचरात
स्पर्श तो कृपाळू
झुलवीतो आनंदात…
वेल भावप्रीतीची
नाहतेच दवबिंदूत
सुगंध फुलाफुलांचा
कोवळ्या ऋतुऋतुत….
गुणगुणता प्रीतरावा
उमलते अंतरी गीत
आभाळ भावनांचे
दाटते मनामनांत….
श्वास अधीर बावरे
ओघळती लोचनात
मोहोळ ते लाघवांचे
आळविते भावगीत….
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २८२
३/११/२०२२
Leave a Reply