शांती आणि सद्भावना जगात सर्वत्र नांदावी असे तिला लहानपणापासूनच वाटायचे कारण तिच्यावर तिच्या वडिलांचा फार प्रभाव होता आणि वडील होते याच तत्त्वांचे कट्टर पुरस्कर्ते. वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी तिने मोठेपणी समाजकार्य सुरू केले व १९४६ मध्ये शांतीसाठी तिला नोबेल पुरस्कारही मिळाला. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या या महिलेचे नाव होते एमिली ग्रीन बालय.
वायएमसीए के लीडर जॉन आरमांट यांच्याबरोबर तिला संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला. मात्र या पुरस्काराची रक्कम एमिलीने आपल्याच संस्थेला देऊन आपण खरीखुरी सामाजिक कार्यकर्ती असल्याचे साऱ्या जगाला दाखवून दिले. अमेरिकेतील जमैका येथे ८ जानेवारी १८६७ साली एमिलीचा जन्म झाला. तिचे वडील वकील होते व शांतता व सद्भावनेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यामुळे एमिलीला लहानपणापासून शांततेचे खास आकर्षण होते. खासगी शाळेत शिक्षण घेऊन एमिलीने समाजशास्त्र व अर्थशास्त्रात पदवी घेतली. पुढे अर्थशास्त्रात तिने संशोधनही केले. १८९१ मध्ये बोस्टन येथे ‘चिल्ड्रन एड सोसायटी’ ही संस्था स्थापन करून तिने समाजसेवेला प्रारंभ केला. कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठीही तिने आणखी दोन संस्था स्थापन केल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या तळागाळातील लोकांच्या समस्याही तिने समजून घेतल्या. अमेरिकेतील त्या वेळी अशा काही शिक्षण संस्था होत्या, की तेथे फक्त ‘गोऱ्या’ विद्यार्थ्यानाच प्रवेश मिळत असे. एमिलीने त्याविरुद्ध आवाज उठवून अशा शिक्षण संस्थांमध्ये ‘काळ्या’ विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यास भाग पाडले. प्रसिद्ध सामाजिक – कार्यकर्ती जेन एडन्स हिने स्थापन केलेल्या ‘वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडम’ या संस्थेची ती महासचिव झाली व जेन एकच्या मृत्यूनंतर ती संस्थेची अध्यक्षा झाली. या संस्थेच्या शांतीच्या कार्याबद्दलच तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिलला. आपल्या आयुष्याच्या अखेरीस एमिलीला दय्याच्या विकाराने ग्रासले होते.
त्यातच तिचा ७ जून १९६१ रोजी अंत झाला. अखेरच्या क्षणी तिच्या मुखातून दोनच शब्द बाहेर पडले ते होते ‘विश्वशांती.’
Leave a Reply