( Deliberate mistakes in the systems hampers progress of the nation.)
– काहीतरी वेगळा विषय वाटतोय ना ?
आहेच वेगळा .
म्हणजे विषय तसा परिचयाचा पण अव्यक्त राहण्यात शहाणपण आहे , हा बाळबोध संस्कार करणारा .
एक जानेवारीला किंवा वर्षप्रतिपदेला आपण अनेक संकल्प करतो .
त्यात डायरीलेखन असाही एक संकल्प असतो .
अनेक वेळेला दोन तीन , जास्तीतजास्त पाच सहा दिवस हा संकल्प टिकतो .
मग तो बारगळून तरी जातो नाहीतर सोयीस्करपणे विसरला जातो .
पण काही नेटाने डायरी लिहितात .
कधी ती कागदाच्या बांधीव आकर्षक स्वरूपात असते , तर कधी मनात असते.
अशा काहींच्या डायऱ्या मध्यंतरी मला सापडल्या .
मात्र त्यातली पानं विस्कटलेली होती .
काही जीर्ण झाली होती ,तर काही विदीर्ण झाली होती .
काही पानातील अक्षरं पुसट झाली होती तर काही पानातील अक्षरं गायब झाली होती .
चिकाटीनं सगळ्या डायऱ्या मी एकत्र केल्या . उत्सुकतेनं सगळी पानं एकत्र केली .वाचू लागलो .
आणि थक्क झालो .
काय होतं त्या डायऱ्यांच्या विस्कटलेल्या पानात ?
कुणी लिहिलेल्या होत्या त्या डायऱ्या ?
कशासाठी लिहिल्या होत्या ?
आणि मुद्दाम तुम्हाला सांगावं असं काय होतं त्यात ?
आहे का उत्सुकता ?
असेल तर डायरीतील विस्कटलेली पाने वाचावी लागतील .
चला तर , थोड्याशा प्रतीक्षेनंतर वाचू या ,
डायरीतील विस्कटलेली पाने
हो , पण शीर्षकात तीन माकडे आहेत .
त्याचा अर्थ माहीत आहेच तुम्हाला .
बोलायचं नाही , ऐकायचं नाही , पहायचं नाही .
म्हणून तर मी ती पाने तुमच्यासमोर सादर करतोय …
अगदी थोडाच वेळ प्रतीक्षा …
— डॉ. श्रीकृष्ण जोशी
रत्नागिरी
Leave a Reply