नवीन लेखन...

गरोदर स्त्रियांसाठी आहार

Diet for Pregnant Women

कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदात फुगून जाते. आपल्या शरीरात एक जीव वाढतो आहे. या गोष्टीवर प्रथम तीचा विश्वासच बसत नाही आणि मुलाला जन्म देणारी हि पहिलीवहिली स्त्री जणू आपणच आहोत. असे क्षणभर वाटण्याएवढा विशेष आनंद तीला होत असतो. आपल्या होणाऱ्या बाळाविषयी ती अनेक स्वप्न बघते, आणि त्या स्वप्नात ती रंगून जाते. परंतु क्वचित कधी बाळाच्या जन्मानंतर किंवा गरोदर  असतानाच तिच्या स्वप्नाचा चुरा होतो . जन्माला आलेले बाळ विकृत किंवा  आजारी असे जन्माला  येते . आणि आता एकविसाव्या शतकांत “एकच अपत्य आणि सुखी दांपत्य” अशी स्थिती  आहे. आता एकच  अपत्य म्हटले तर दाम्पत्याच्या सर्व आशा आकांक्षा  त्यावरच अवलंबून  असतात .

“ एक अपत्य सुखी दांपत्य” या सूत्राच्या सर्व दांपत्यानी अवलंब केलातर वणव्याप्रमाणे फोफावलेल्या लोकसंख्येला आळा बसेल शिवाय एकच अपत्य असल्यामुळे त्यावर सर्व लक्ष केंद्रित करून त्याला सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांगपरीपूर्ण बनविता येईल. यासाठी गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेनंतर म्हणजेच  सगर्भावस्थेत बालकाच्या जन्मापूर्वीपासून संस्कार करणे शक्य आहे. बाळाच्या निर्मितीसाठी माता-पिता हे कारणीभूत असतात. त्यामुळे माता-पित्यांची शारीरिक अवस्था आरोग्यपूर्ण, सुसंस्कारित व शुद्ध असावी लागते. शरीरशुद्धी व मन:शुद्धी यासाठी आहार-विहाराचा विचार आवश्यक आहे. पथ्थ्यकर आहार-विहाराने  बीजनिर्मिती उत्तम होऊ शकते व आरोग्यपूर्ण  बीजसंयोगातून मातेच्या उदरात जन्माला येणारा अंकुर हा परिपूर्ण असतो.

गर्भधारणेनंतर पित्याचा सहभाग संपतो. मग उरते फक्त माता. तीला नऊ महिने नऊ दिवस त्या अंकुराचे स्वत:च्या उदरात पोषण करावयाचे असते. तीच्या आहार-विहार, आचार-विचाराचा परिणाम बाळावर होत असतो. याचा प्रत्यय आपणास वारंवार येतोच. वैदिक कालापासून आजपर्यंत आपण वाचत असलेल्या कथांमधून हे आपणास जाणवत असते. गर्भिणी अवस्थेतील  आहार-विहाराचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. कारण हे जग वेगवेगळ्या ग्रहांवर जातेय, तेव्हा प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारया जगास हाताला हात धरून आणखी पुढे नेण्यासाठी आपल्या बाळाचे योगदान असावे अशी प्रत्येक मातेची मनोकामना असतेच.

बाळाच्या वाढीसाठी मातेचा आहार कसा असावा त्यापेक्षा तो कसा असू नये हा विचार मला जास्त महत्वाचा वाटतो. आजच्या युगात स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करित आहेत. त्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत परंतु सर्व क्षेत्रामध्ये पुरुषाच्या  काही वाईट सवयीमध्येहि बायका त्यांचा खांद्याला खांदा लावू पहात आहेत. हि अत्यंत खेदाची बाब आहे. यात धृम्रपान, मद्यपान किंवा इतर मादक, उत्तेजक पदार्थांचे सेवन उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या स्त्रिया राजरोसपणे करीत आहेत. याचा वाईट  परिणाम त्यांच्या स्वत:च्या जीवनावर तर होतोच  परंतु त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या अपत्यावरही होतो. हे स्त्रियांना विसरून कसे चालेल? स्त्रीस्वातंत्र्याचा हा मिथ्यायोग म्हणता येईल.

एखादे व्यसन जडल्यावर मनुष्य स्वत:ला काबूत ठेवू शकत नाही. व हे खरे आहे परंतु व्यसनाच्या आधीन जाण्यापूर्वी आपण शंभर वेळा विचार करून स्वत: सावरलेले बरे  स्त्रियांवर संपूर्ण घर अवलंबून असते. तीचे विपरीत वागणे व्यसनाधीन होणे तिच्या स्वत:च्या घरालाच नव्हे तर समाजासाठी सुद्धा विघातक ठरते. कारण घरा-घरातून निर्माण होणारा समाज ह्या स्त्रियाच घडवत असतात. तेव्हा स्त्रियांनी संयमी असणे हि समाजाची  गरज आहे. याचा अर्थ असा नव्हे की पुरुषाने बेबेंद वागावे. स्त्री आणि पुरुष हि एकाच रथाची दोन चाके आहेत. बेबंद पुरुषाला आपल्या प्रेमशक्ती व संयमाने बांधून ठेवणे स्त्रियांसाठी सहज शक्य आहे.

अपत्ये हि अप्रत्यक्षपणे स्त्रियांवर अवलंबून असतात. परंतु विशेषत: सगर्भावस्थेतमधे व प्रसूतीनंतर काही काळ ते मातेवर पूर्णत: अवलंबून असतात. म्हणून या काळात स्त्रियांनी व्यसनपासून स्वत:ला अलिप्त ठेवणे आवश्यक आहे. यात धूम्रपान करणे, तंबाखू खाणे, दातास मिश्री लावणे, मद्यपान करणे, ताडी-सिंधी पिणे व इतर घातक व मादक औषधीद्रव्यांचा वापर करणे याचा समावेश असू शकतो. याचा परिणाम बालकांच्या शरीरावर व बुद्धीवर प्रत्यक्ष होत असतो. याशिवाय या काळात आनंदी व प्रसन्न राहणे, वृत्ती सात्त्विक ठेवणे आवश्यक आहे. यासाठी प्राणायाम, ध्यान-योगासन यांची मदत होऊ शकते. आवड असणाऱ्यांनी पूजा-अर्चा करण्यास हरकत नाही. अलीकडच्या यंत्रयुगात मानवता तळाशी गेलेली असून हिंसाचार बोकाळलेला आहे. अश्या वेळी “सुसंस्कारित अपत्य निर्मिती” हि काळाची गरज आहे.

मातेच्या व्यसनाचा परिणाम बाळाच्या केवळ मानसिक विकासावर होतो असे नव्हे तर त्यामुळे बालकाचा शारीरिक विकासही खुंटतो. गर्भिणी अवस्थेमधे धृम्रपान करणारया स्त्रियांमधे बालकाचे वजन ३०० ग्रॅम ने कमी होते असे अलीकडे झालेल्या अभ्यासात सिद्ध झालेले आहे. ज्या गर्भिणी माता निर्व्यसनी आहेत, त्यांच्या बाळाचे वजन प्राकृत असते. यावरून व्यसनाधीन स्त्रियांनी  काय तो बोध घ्यावा. मद्यपान करणाऱ्या स्त्रियांच्या बालकामधे पोटाच्या तक्रारी आधिक असतात. त्यांच्या पाचनप्रक्रियेमधे  वारंवार बिघाड होतो. हे एका अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. याशिवाय आणखी इतर व्यसने असताना काय दुष्परिणाम होतील हे सांगायला नको! सामान्यपणे गर्भिणी स्त्रियांनी खालील गोष्टींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये.

१ .  चहा, कॉफी यांसारखी उत्तेजक पेय घेण्याचे टाळावे.

२.  मसाले, तिखट, आंबट, तिक्ष्ण-उष्ण, जास्त प्रमाणात मीठ अश्या पदार्थांचे सेवन करू नये.

३.  मांसाहार, मासे, पूर्णत: बंद करावेत.

४.  जेवताना रात्रीच्या जेवणात उरलेले, फ्रीजमधे साठवून ठेवलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.

५.  आंबवलेले पदार्थ, वडापाव, इतर रुक्ष पदार्थ खाण्याचे टाळावे .

६.  गरोदरपणाच्या शेवटच्या काळात प्रवास शक्यतो टाळावा.

७. साडी किंवा गाऊन सुती व सैल असावेत. अंगाला चिकटणाऱ्या व घट्ट प्रावरणाचा उपयोग टाळावा .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..