नवीन लेखन...

मानसिक डाएट

Diet of the Mind

ही कन्सेप्ट जरा नविन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

म्हणजे बघाना….

आपलं वजन वाढतं, आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो, बीपीच्या गोळ्या सुरु होतात, शुगर डिटेक्ट होते, किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.

हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.

मी कुठेतरी वाचलं होतं की “तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो”

ते वाक्य मनाला प्रचंड भिडलं. त्या वेळी मग खरंच विचार केला की आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का जेवढी शरीराला आहे?

अफसोस !

असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे…

“इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील”

अवघंड आहे असं होणं….

मानसिक डाएट म्हणजे काउंसिलींग नव्हे.

मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल !

हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं स्वत:च तोंड कडु का असेना, पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस !

स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.

तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं

तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,

तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,

अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्‍याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु, दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ, आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकं ओळखुन स्वत:ला “रीझनेबल” बनवणं, दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं, दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालु ठेवणं, मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं, एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आणि बरंच काही.

या सगळ्यातला समतोल हरवला ना की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळु शकते.

माणुस आहे, मनं पण थकतं हो कधीकधी, त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने, वाह ताज !!!

सगळ्यात महत्वाचं कि आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतातं.

लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या. तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो, तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं. वास्तविक, मन ओके असेल तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

असं ह्या डाएटचं व्रत हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की. साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल. शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.

बदल हा नेहमीच चांगला असतो. असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?

कारण गुगलवर “एव्हरेस्ट” बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं मनंच खरी ताकद देणार आहे.

— गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ
9820584716

Avatar
About डॉ. गौरी पाटील 11 Articles
डॉ. गौरी पाटील या बोरीवली, मुंबई येथील निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..