नवीन लेखन...

लोखंड व पोलाद यातील फरक

लोह हे नाव आपण १०० टक्के शुद्ध मूलद्रव्याला दिले तर लोखंड आणि पोलाद ही त्याची दोन महत्त्वाची संमिश्रे आहेत. लोह हा धातू आणि कार्बन हा अधातू यांच्या मिश्रणातून लोखंड आणि पोलाद तयार होतात. कार्बनव्यतिरिक्त या संमिश्रांमध्ये सिलिकॉन आणि मँगेनीजही असते.

लोखंडामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते. साधारण २ टक्क्यांपेक्षा जास्त कार्बन असलेल्या संमिश्रांना लोखंड असे म्हटले जाते. या संमिश्रापासून बनविल्या जाणाऱ्या उपयोगी वस्तू मुख्यत ओतकामाने बनवत असल्याने यांना ओतीव लोखंड (कास्ट आयर्न) असेही म्हणतात. तयार करण्याच्या पद्धती आणि कार्बनचे प्रमाण यावरून व्हाईट आयर्न, ग्रे आयर्न आणि नॉड्युलर आयर्न अशी वेगवेगळी संमिश्रे होतात.

लोखंडाचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास केल्यास त्यात मुक्त कार्बनच्या रेषा दिसतात. (चित्रातील काळ्या रेषा) धातूमध्ये या अधातूचे अस्तित्व बारीक चिरांसारखे काम करते. त्यामुळे लोखंडाची ताण सहन करण्याची क्षमता खूप कमी होते. परंतु या मुक्त कार्बनमुळे दाब आनि कंपने सहन करण्याची क्षमता मात्र वाढते. लोखंडाचा दाब आणि कंपने सहन करण्याच्या गुणधर्मामुळे त्याचा वापर अवजड यंत्रे ठेवण्याचे ब्लॉक, मोटारीच्या इंजिनचा बाहेरचा भाग, पंपाची आवरणे अशा कामांकरिता केला जातो.

पोलादामध्ये कार्बनचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षा कमी असते. सिलिकॉन आणि मँगेनीजचे प्रमाणही लोखंडापेक्षा कमी असते, तर फॉस्फरसचे प्रमाण अत्यल्प असते. पोलादामधला कार्बन हा लोखंडाप्रमाणे मुक्त नसून आयर्न कार्बाइड (Fe3C) या संयुगाच्या स्वरूपात असतो. त्यामुळे पोलादाची ताण सहन करण्याची क्षमता लोखंडापेक्षा खूपच जास्त असते.

कार्बनच्या प्रमाणानुसार पोलादाची कमी कार्बनयुक्त पोलाद (%C<0.4% ), मध्यम कार्बनयुक्त पोलाद (0.4% < %C <0.6% ) आणि (% C> 0.6%) उच्च कार्बनयुक्त पोलाद अशी विभागणी केली जाते. कार्बनच्या वाढत्या प्रमाणानुसार पोलादाचे काठिण्य आणि ताणक्षमता वाढत जाते. पोलादाच्या या गुणधर्मामुळे आजच्या जगात त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. बांधकामातल्या कांबी, रेल्वेचे रूळ, मोटारीचे पत्रे, फ्रिज, वॉशिंग मशीन, कपाटे, कुंपणाच्या तारा इत्यादी अगणित गोष्टींसाठी पोलाद वापरले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..